महाराष्ट्र

maharashtra

Naxals Killed Two Persons : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या

By

Published : Apr 14, 2022, 6:28 PM IST

Updated : Apr 14, 2022, 8:21 PM IST

naxal file photo

स्थानिक दोन नागरिकांची नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून हत्या (Naxals Killed Two Persons in Gadchiroli) केल्याची घटना आज (14 एप्रिल) उघडकीस आली. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

गडचिरोली - जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित सुरजागड लोह प्रकल्पस्थळी 13 एप्रिलला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दोन हजार युवकांना रोजगार नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला बारा तास उलटत नाही तोच स्थानिक दोन नागरिकांची नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून हत्या (Naxals Killed Two Persons in Gadchiroli) केल्याची घटना आज (14 एप्रिल) उघडकीस आली. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

दोघांची दगडाने ठेचून हत्या - गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात कालच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली सक्रिय झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रात गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत ही घटना घडली आहे. दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एक ग्रामस्थ दलसू हिचामी याची झारेवाडा येथे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, तर दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन नरोटे याची गोलगुट्टा येथे हत्या केली. ते दोघेही आपल्या घरी झोपलेले असताना रात्री नक्षलवादी गावात आले आणि दोघांनाही उचलून गावाबाहेर नेले. त्यानंतर आज सकाळी त्या दोघांचेही मृतदेह रस्त्यावर आढळून आले. या घटनेनंतर नक्षल शोधकामी अधिक पोलीस कुमक रवाना करण्यात आली आहे.

Last Updated :Apr 14, 2022, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details