महाराष्ट्र

maharashtra

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला

By

Published : Aug 17, 2020, 6:01 PM IST

पुरामुळे सिरोंचा-असरअल्ली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या पुढे सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, काल पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली. तर, तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.

पुराचे दृश्य
पुराचे दृश्य

गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड-आलापल्ली मार्ग शनिवार रात्रीपासून बंद झाला आहे. आज काही प्रमाणात पूर ओसरला असला तरी कुमरगुडा नाल्यावर पुराचे पाणी असल्याने भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटलेला आहे.

पुराचे दृश्य

पुरामुळे सिरोंचा-असरअल्ली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या पुढे सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, काल पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली आहेत. तर, तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.

गेल्या ५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने भामरागड लगतची पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती ही नदी दुथडी भरून वाहत आहे. काल सायंकाळच्या सुमारास पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले होते. तर, रात्री उशिरा भामरागड गावातही पाणी शिरले होते.

दरम्यान, पोलीस व महसूल प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर, काल गड अहेरी नाल्याची पाणी पातळी वाढल्याने गड अहेरी मार्ग काही वेळासाठी बंद होता. आज हा मार्ग सुरू झाला आहे.

हेही वाचा-पर्लकोटा नदीला पूर : भामरागडमध्ये शिरले पाणी, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

ABOUT THE AUTHOR

...view details