महाराष्ट्र

maharashtra

धुळे तालुक्यातील बोरविहिर शिवारात आढळला महिलेचा मृतदेह, खून केल्याचा संशय

By

Published : Aug 6, 2021, 6:44 PM IST

death body found

बोरविहिर शिवारात आज एका अनोळखी महिलेचा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे बोरविहिर शिवारात एकच खळबळ उडाली.

धुळे - तालुक्यातील बोरविहिर शिवारात आज एका अनोळखी महिलेचा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे बोरविहिर शिवारात एकच खळबळ उडाली. मात्र, या महिलेच्या कपाळावर गंभीर इजा तसेच शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत असल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांसह ठसेतज्ज्ञ व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी एकमेव मोबाईल चार्जर हा तपासासाठीचा पुरावा सापडला आहे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन काळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details