महाराष्ट्र

maharashtra

Youth Beaten in Chandrapur : ट्रॅक्टरला बांधून युवकाला बेदम मारहाण; महिलांकडे संशयित नजरेने बघितल्याचा ठपला; जामीनपात्र गुन्हा दाखल

By

Published : Apr 3, 2023, 8:44 PM IST

Updated : Apr 3, 2023, 10:42 PM IST

महिलांना संशयित नजरेने बघतो असा ठपका ठेवत एका मजूर युवकाला ट्रॅक्टरला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला असून सर्व स्तरातून याचा तीव्र निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी यात जामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील बेळगाव येथील ही घटना आहे.

Youth Beating In Chandrapur
युवकाला मारहाण करताना

मजुराला मारहाण करताना गावातील दबंग युवक

चंद्रपूर:बेळगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून तेथे नळाची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. बीड जिल्हा निवासी भागवत जगताप यांनी या कामाचे कंत्राट घेतले होते. 1 एप्रिलला पाईप टाकण्याचे काम सुरू होते. हे काम अवसरे कुटुंबाच्या घराजवळ सुरू होते. यावेळी मजूर राहुल जगदाडे याची महिलांकडे पाहण्याची नजर वाईट आहे, असे सांगत राहुल जगदाळेला आरोपी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांनी थेट मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या मजुराला दोरीने ट्रॅक्टरला बांधले आणि त्याला अमानुष मारहाण सुरू केली.

मजुराला बेदम मारहाण: यानंतर त्याला अश्लील शिवीगाळ करत त्याचे कपडे फाडत त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. पीडित राहुलला धारदार शस्त्र दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. विशेष म्हणजे, हा सर्व घटनाक्रम आरोपींनी आपल्या मोबाईलमधून चित्रित केला. यानंतर यातील अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आणि समाजमाध्यमांत संतापाची लाट उसळली. यानंतर कंत्राटदार जगताप यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. स्थानिक पोलिसांंनी आरोपी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र हे कलम जामीनपात्र असून यात आरोपी सहज सुटू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तुर्तास पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.


कामाला जात नसल्याने मजुरास मारहाण:ऊस तोडणीच्या कामाला जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने, गेवराई तालुक्यातील एरंडगावच्या एका ऊसतोड मजुराने शुक्रवारी (26 सप्टेंबर, 2020 रोजी) आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली होती.

दोन पोलीस निलंबित:ऊसतोड मजुराला मारहाण केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. ऊस तोडणीच्या कामाला जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील एरंडगावच्या एका ऊसतोड मजुराने शुक्रवारी आत्महत्या केली होती. त्याच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली होती. अखेर शनिवारी या प्रकरणात मजुराला मारहाण केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले.

काय आहे घटना?गेवराई तालुक्यातील एरंडगावचा ऊसतोड मजूर आसाराम सखाराम कवठेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाऊ किसन कवठेकर यांच्या तक्रारीवरून मुकादम बाळू उर्फ गणेश दत्ता गिरी, विकास दत्ता गिरी, सचिन दत्ता गिरी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी उद्धव जरे, पोलीस कर्मचारी रेवणनाथ दुधाने व अन्य दोघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तत्काळ त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस कर्मचारी जरे व दुधाने यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.


हेही वाचा:Sanjay Shirsat Criticized Shushma Andhare: सुषमा अंधारे विषय माझ्यासाठी संपला - संजय शिरसाट

Last Updated :Apr 3, 2023, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details