महाराष्ट्र

maharashtra

Income Tax Raids : चड्डा ट्रान्सपोर्ट मालकाच्या कार्यालय घरावर छापेमारी; आयकर विभागाची कारवाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 4:10 PM IST

Income Tax Raids : चड्डा यांच्या नागपूर आणि चंद्रपूर येथील कार्यालय व निवसस्थानी छापे टाकण्यात आले. यात दिल्ली, नाशिक आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी अचानक कारवाई (Income Tax Chadda Transport Office) सुरू केली आहे.

Income Tax Raids
चड्ढा ट्रांसपोर्ट मालकाच्या कार्यालय छापेमारी

चंद्रपूर Income Tax Raids: वाहतूक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करणाऱ्या चड्डा ट्रांसपोर्टच्या मालकाच्या घरावर आणि कार्यालयावर (Chadda Transport Residence) आयकर विभागाच्या पथकानं नागपूर आणि चंद्रपुरातील कार्यालय आणि घरावर धाडी टाकल्या (Income Tax Chadda Transport Office). कर चुकवेगिरीचा हा प्रकार असून दिल्लीतील पथकानं बुधवारी सकाळी या धाडी टाकल्या आहेत. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील या धाडी टाकण्यात आल्या आहेत. गुरूवारी सुरू झालेली ही कारवाई आजही सुरू असल्याची माहिती आहे. पथकानं काही महत्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत. तर याची पडताळणी सुरू आहे. यातून कोळशाच्या करचुकवेगिरीचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




कार्यालय व निवसस्थानी छापे : बुधवारी चड्डा परिवाराच्या नागपूर आणि चंद्रपूर येथील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकण्यात आले. यात दिल्ली, नाशिक आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी कार्यवाही सुरू केली. चड्डा ट्रान्सपोर्टचं कार्यालय हे पडोली परिसरात आहे. येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये 30 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. चड्डा कुटुंबातील प्रमुख असलेले मनीष चड्डा (Manish Chadda) यांच्या निवासस्थानीही प्राप्तिकर विभागाच्या चंद्रपूरच्या एका स्वतंत्र पथकाने छापा टाकला. या कारवाईची माहिती कुणालाही मिळाली नाही. याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र याबाबत पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून आज या ठाण्यातील पाच कर्मचारी चड्डा यांच्या कार्यालयात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

व्यापारी वर्गात उडाली खळबळ: चड्डा कुटुंबाची कार्यालये आणि निवासस्थानावरील कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची चाचपणी सुरू आहे. वाहतूक क्षेत्रात चड्डा कंपनीचा दबदबा आहे. तब्बल एक हजराहून जास्त ट्रक त्यांच्या कंपनीमध्ये आहेत. वेकोलीची कोळसा खाण, खासगी कोळसा खाण, ओव्हरबर्डन आणि वाहतूक करण्याच्या कामाचे कंत्राट ही कंपनी घेते. या कंपनीची वार्षिक उलाढाल ही शेकडो कोटींच्या घरात आहे. या घडामोडीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या तपासात नेमके काय झाले हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. IT Raids Pune: पुण्यातील निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; 40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल
  2. Income Tax Raid On Abu Azmi : अबू आझमींच्या निकटवर्तीयांवर टाकलेल्या छाप्यात सापडलं 'मोठं' घबाड, विनायक ग्रुपची 250 कोटीची मालमत्ता जप्त
  3. Fake Income Tax Raid : दिल्लीतील व्यावसायिकावर 'स्पेशल 26' स्टाईल रेड, 7 जण बनावट आयकर अधिकारी बनून आले

ABOUT THE AUTHOR

...view details