महाराष्ट्र

maharashtra

Bhendwal Ghatmandani : भेंडवळ येथील घाटमांडणीचा काय असेल अंदाज? वाचा सविस्तर

By

Published : Apr 22, 2023, 10:30 PM IST

पाऊस, पिकाचा अंदाज सांगणाऱ्या भेंडवड येथील प्रसिद्ध घट मांडणीमध्ये आज घट मांडण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली आहे.

Bhendwal Ghatmandani
Bhendwal Ghatmandani

बुलडाणा :भेंडवड येथील प्रसिद्ध घट मांडणीमध्ये आज घट मांडण्यात आले आहे. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानले जातात. या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे उद्या सूर्योदयाच्या वेळी संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून वाघ महाराज पुढील वर्षभरातील पाऊस, पिक परिस्थिती सोबतच राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवणार आहेत. ३५० वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात.

साडेतीनशे वर्षांपासून परंपरा :बुलडाण्यातील भेंडवळला परंपरा आहे. या परंपरेला परिसरात तसेच राज्यात मान्यता आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. त्यानुसार भेंडवळ गावात घाटाची मांडणी केली आहे. गावच्या परंपरेनुसार हा अंदाज बांधला जातो. शेतात खड्डा, खड्ड्यात माती साचलेली, बुजलेल्या जागेत पाणी आणि त्यावर चिखल. त्यांच्या शेजारी सुपारी असलेले विविध 18 प्रकारचे धान्य. ऋतू, पिके, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घटनांचा अंदाज या तक्त्यावरून वर्तवला जातो.

ग्रामस्थांचा विश्वास :बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकऱ्यांचा दावा आहे की, अक्षय्य तृतीयेला ही प्रथा 350 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. ही पद्धत शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. या व्यवस्थेच्या माध्यमातून जाहीर होणाऱ्या अंदाजाबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील शेतकऱ्यांची या प्रथेवर प्रचंड श्रद्धा आहे. येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात हा घाट व्यवस्था होणार आहे. पाऊस किती पडेल याचा अंदाज यंदा किती पाऊस पडेल, याचा अंदाज या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता :ही प्रथा आज त्यांचे वंशज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज यांनी सुरू ठेवली आहे. जे निसर्गातील घटनांचे निरीक्षण करतात आणि अंदाज बांधतात. गेल्या तीन वर्षांत देशावर कोरोनासारख्या भयंकर संकटाने थैमान घातले आहे. याला शास्त्रीय आधार नसला तरी शेतकऱ्यांचा विश्वास आहे. पण येत्या वर्षभरात देशात नेमका पाऊस, पिके, राजकीय परिस्थिती काय असेल? हे अंदाज कितपत खरे आहेत? या प्रथेला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी शेतकऱ्यांचा यावर मोठा विश्वास आहे. या पद्धतीनुसार ते त्यांचे वार्षिक शेतीचे नियोजन करतात हे विशेष.

हेही वाचा - Amruta Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाबाबत विधान; अमृता फडणवीस थेटच म्हणाल्या...पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details