Amruta Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाबाबत विधान; अमृता फडणवीस थेटच म्हणाल्या...पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 22, 2023, 9:20 PM IST

thumbnail

पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विद्यामान उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केले आहे. राज्यातील जनतेला जे माणुस न्याय देईल ती व्यक्ती मुख्यमंत्री झालेली बघायला आवडेल अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री पदाची व्यक्ती कोणत्याही पक्षाची असला तरी चालेल मात्र, त्यांने स्वर्थ न पहाता जनतेचे काम करायला हवे, समाजासाठी काम करायला हवे अशा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणुन चालेल असे फडणीस म्हणाल्या. पुण्यात एका शाळेच्या कार्यक्रमानिमित्त अमृता फडवणीस आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या देवेंद्र फडवणीस हे राजकारणातले चाणक्य मानले जातात. प्रत्येक जण भाजपासोबत जोडला जाण्यात देवेंद्र फडवणीस यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्या दोघांच्या मैत्रीवर सुद्धा भाष्य करताना अनेक राजकीय लोकांची मैत्री असते, पण ती किती घट्ट आहे. जवळ आहे ते त्या दोघांना विचारा अशी प्रतिक्रिया सुद्धा अमृता फडणविस यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.