महाराष्ट्र

maharashtra

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दरोडा; साडेचार लाखांचा ऐवज लंपास..

By

Published : Feb 8, 2021, 9:33 AM IST

घरातील मथुराबाई राठोड यांच्यासह घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लुटला. एवढेच नाही तर, राठोड यांच्या भाडेकरुंच्या घरातही दरोडा टाकला.

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दरोडा
सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दरोडा

बुलडाणा- मेहकर शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी पाच दरोडेखोरांनी जीवे मारण्याची धमकी देऊन जवळपास साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जीवे मारण्याची धमकी देत दरोडा

मेहकर शहरातील बालाजी नगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड राहतात. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारात पाच अज्ञात दरोडेखोरांना घरात प्रवेश केला व घरातील मथुराबाई राठोड यांच्यासह घरातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लुटला. एवढेच नाही तर, राठोड यांच्या भाडेकरुंच्या घरातही दरोडा टाकला. सोबतच दरोडेखोरांनी पोलीस कर्मचारी अतुल पवार यांच्या गेटचे कुलूप तोडून दुचाकी वाहनही लंपास केले. या प्रकरणामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details