महाराष्ट्र

maharashtra

Pravin Togadia : मित्रांचे सरकार येताच भोंग्याबाबतच्या आंदोलनाचा विसर; तोगडियांचा राज ठाकरेंना टोला

By

Published : Feb 9, 2023, 6:56 PM IST

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हे काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खामगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला आहे. यावेळी तोगडिया यांनी थेट राज ठाकरे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार असताना आंदोलन छेडले होते तसे आंदोलन त्यांनी आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात छेडले तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, तोगडिया यांच्या या वक्तव्याने हा भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Pravin Togadia
Pravin Togadia

तोगडिया

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात कोल्हटकर स्मारक येथे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान या कार्यक्रमाला आलेले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी उपस्थितांना संबोधितही त्यांनी केले आहे.

हिंदू जन आक्रोश मेळावा : देशात हिंदू वरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतानाच लव्ह जिहाद सारख्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे देशात हिंदू असुरक्षित असून, योग्यवेळी हिंदू जागृत न झाल्यास एक दिवस या देशात हिंदू अल्पसंख्यांक बनवून राहील अशी भीती आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय महिला परिषद, आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक कोलाटकर स्मारक मंदिरात आयोजित हिंदू जन आक्रोश मेळाव्यासाठी ते आले होते त्यावेळी पत्रकारांनी प्रवीण तोगडिया यांना प्रश्न विचारले आहेत.

आपण आंदोलन केले तर मी आपल्यासोबत : अजाण आणि लाऊस्पिकरच्या बाबतीत राज ठाकरेंना विचारा काय झालं?, आता त्यांच्या मित्रांचे सरकार आले आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून अजाण आणि लाऊडस्पिकर बंद करणार आहात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही. मात्र, जेव्हा त्यांचे सरकार होते तेव्हा तुम्ही मैदानात होते. मात्र, आता आपले मित्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्याने आपण आंदोलन करत नाहीत का? यांच्या काळात आपण आंदोलन केले तर मी आपल्यासोबत राहील असही तोगडिया यावेळी म्हणाले आहेत.

प्रकरण काय ? : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मशिदीवरील भोंगे निघाले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाचा असे थेट आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. यावरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली गेली. दरम्यानच्या काळात, देशभरात भोंगा हा मुद्दा गाजला होता. अनेक ठिकाणी भोंगे काढण्यातही आले. तसेच, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

हेही वाचा :शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details