महाराष्ट्र

maharashtra

Buldhana Crime News: खळबळजनक! १० वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना

By

Published : Apr 12, 2023, 1:12 PM IST

१० वर्षीय भाचीवर चाळीस वर्षीय मामाने बलात्कार केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मामाला पोलिसांनी शिताफीने पकडले आहे.

Buldhana Crime News
मामाने केला बलात्कार

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. ४० वर्षीय वासनांध मामाने अवघ्या १० वर्षीय चिमुकलीवर घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मामा भाचीच्या पवित्र नात्याला कालीमा फासणाऱ्या या नराधम मामा विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातून जोर धरू लागली आहे.


अमानुष लैंगिक अत्याचार :आरोपी पुणे येथे कामाला आहे. तो बुलढाणा जिल्ह्यात आपल्या बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलला रात्री त्या मामाने आपल्या १० वर्षीय भाचीचे तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलून नेले. तिच्यावर बळजबरीने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला. हे दृष्कृत्य केल्यानंतर तो पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. शहर पोलीस ठाण्यात याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. आरोपी मामाविरुध्द या प्रकरणी पोलिसांनी कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय) सहकलम ४, ६, ८ पोक्सो या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री शहर पोलिसांच्या डिबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे. शहरामध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे.


आरोपीला अटक केली : दहा वर्षीय चिमुकलीला आपल्या वासनेचा बळी ठरवणाऱ्या या नराधमाला त्या चिमुकलीची जराही दया आली नाही का? असाही सवाल सर्वसामान्य विचारताना पाहायला मिळत आहेत. आरोपी हा नात्यातला असल्याने त्याच्या विरोधात कोणी पोलिसात जाणार नाही, असे त्याला वाटले होते. मात्र, चिमुकलीच्या आईला सर्व प्रकार पीडित मुलीने सांगिल्यानंतर स्वतःच्या भावाविरोधात या चिमुकलीच्या आईने थेट शहर पोलीस स्टेशन गाठले. या नराधमाविरोधात आपली ठोस भूमिका घेतली. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर नराधमाला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तपास चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा : Nagpur Crime : धक्कादायक! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने बघितले YouTube वर व्हिडिओ अन् केली स्वत:ची प्रसुती; बाळाचा मृत्यू...बलात्काराची तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details