महाराष्ट्र

maharashtra

भाजपची जन आशीर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेलचे दर 200 रुपयांपर्यंत नेण्यासाठी - नाना पटोले

By

Published : Aug 18, 2021, 4:58 PM IST

Updated : Aug 18, 2021, 5:41 PM IST

c
c ()

भाजपची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल-डिझेलचे दर 200 रुपयांपर्यंत नेण्यासाठी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

बुलडाणा - भाजपच्या वतीने महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. मात्र, भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेलला 200 रुपयेपर्यंत नेण्यासाठी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडण्यातून केली.

बोलताना नाना पटोले

ते बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे आगामी जिल्हा परिषद, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात विजय निर्धार मेळाव्यासाठी ते मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) रात्री उशिरा ते खामगाव येथील कार्यक्रमाला पोहचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी भर पावसात मशाल पेटवून कांग्रेसजन यांना शपथ दिली.

क्रिकेट मध्ये सेंच्युरीनंतर मिळते आशीर्वाद

एकीकडे 70 रुपये प्रति लिटर आमच्याकडून घेतले जातात.कशासाठी घेतात,काय घेतात त्याचा हिशोब नाही.आपल्याला जो पेट्रोल-डिझेल मिळतो,तो पेट्रोल 30 रुपये आणि डिझेल 22 रुपये प्रति लिटर मिळते.मग पेट्रोल-डिझेल शंभरी पार कशाला केली.आत्ता हे लोक निघालेत जन आशीर्वाद यात्रा घेऊन,आपण क्रिकेटचे खेळ पाहतो.संच्युरी झाली की आपण आशीर्वाद देतो.नंतर म्हणतो दुसरी संच्युरी कर,आत्ता यांनी पेट्रोल-डिझेलची संच्युरी केली. आता हे जन आशीर्वाद घेऊन निघाले यांना 200 रुपये पेट्रोल-डिझेल करायचे आहे त्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे, शी टीका नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे देशात कोरोना हत्याकांड घडले, नाना पटोलेंचा घणाघात

Last Updated :Aug 18, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details