महाराष्ट्र

maharashtra

Students Suicide : बी. कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या युवकाने महाविद्यालयात केली आत्महत्या

By

Published : Feb 1, 2023, 10:53 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या खोलीत आत्महत्या केल्याची घडना घडली आहे. सुरज गावंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने पेपर सुरु असतांना एका वर्ग खोलीत रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

Students Suicide
Students Suicide

बुलढाणा : जिल्ह्यात बी कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या खोलीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात बीकॉमच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणारा वीस वर्षीय विद्यार्थी सुरज गावंडे याने पेपर सुरू असताना एका वर्ग खोलीत रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र बीकॉमच्या प्रथम सत्राची सद्या परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

वर्ग खोलीत आत्महत्या :आज बीकॉम प्रथम वर्षाचा अकाउंट या विषयाचा पेपर होता आणि पेपर सुरू होण्याआधीच या विद्यार्थ्यांना एका वर्ग खोलीत आत्महत्या केली आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील ही घटना आहे. वर्ग खोलीत विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरू असताना महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना हा विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

पंख्याला घेतला घळफास :जळगाव जामोद - तालुक्यातील येनगाव येथील मूळ रहिवासी असलेले रामकृष्ण गावंडे यांचा मुलगा सुरज रामकृष्ण गावंडे वय अंदाजे वीस वर्ष हा जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात बी.कॉम शाखेत प्रथम वर्षात शिकत घेत होता. आज तो सकाळी कॉलेजला लवकर आला, परीक्षा सुरू असल्यामुळे शाळेतील काही कर्मचारी प्रत्येक वर्गात डेस्कवर रोल नंबर टाकण्यासाठी गेले असता एका रूममध्ये सुरज गावंडे त्यांना पंख्याला लटकलेला दिसला.

गावात हळहळ :कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्याला खाली उतरून स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करिता दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी सुरज गावंडे ह्याला मृत घोषित केले. सुरज गावंडे हा अभ्यासामध्ये हुशार मुलगा होता. त्याने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न उपस्थित होत आहे? तसेच त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनामध्ये शहर पोलीस करीत आहेत. सुरजच्या आत्महत्येचा मागचे कारण नेमके काय हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

आत्महत्या मागचे कारण अपष्ट : अद्याप पर्यंत त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण काय ते पोलीसाना कळलेले नाही तसेच पुढील तपास करून याचे कारण काय ते समोर येईलच .पण प्राप्त माहितीनुसार सुरज गावंडे या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यामध्ये नेमकं काय लिहिलेला आहे तो तपशील अद्याप समजलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा -Koyta Gang : कोयता गँग पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून बक्षिस

ABOUT THE AUTHOR

...view details