महाराष्ट्र

maharashtra

दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त शहाणे आहेत का?, चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली

By

Published : Sep 3, 2021, 11:00 PM IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ()

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना जीभ घसरली आहे. 'इतर ठिकाणी शेतकऱ्यांना कायदा मान्य आहे. मग, दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त हुशार आहेत का?' अशी टीका पाटील यांनी केली आहे. दिल्लीमध्ये गेले 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करून, आंदोलन सोडवावे. मात्र, त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पाटील यांनी वरील टिप्पणी केली आहे.

बुलडाणा -झोपेलेल्या शेतकऱ्यांना उठवू शकतो. मात्र, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसे उठवणार? असा प्रश्न करत, इतर ठिकाणी शेतकऱ्यांना कायदा मान्य आहे. मग, आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त हुशार आहेत का? अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दिल्लीमध्ये गेले 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करून, आंदोलन सोडवावे. मात्र, त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता, पाटील यांनी वरील टिप्पणी केली आहे. ते बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना

'संजय राऊत हे रोज सकाळी प्रवचन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत'

महाविकास आघाडीतील सगळे नेते हे राजकीय नेते कमी आणि डॉक्टर जास्त झाले असल्याचा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे.तसेच, संजय राऊत हे रोज सकाळी प्रवचन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्याकडे आणि त्यांच्या सामनाकडे आम्ही लक्ष देत नाहीत अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली आहे.

'त्यांच्या या म्हणण्याला काही जोडलेले नाही'

सध्या महाविकास आघाडीतील सर्वांना वाटते, की आम्ही वैफल्यग्रस्त झालोय, डोके दुखतात. त्यांचे संतुलन बिघडले आहे. मात्र, त्यांच्या या म्हणण्याला काही जोडलेले नाही. चंद्रकांतदादा पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून, ते काहीही बोलतात त्यांच्याकडे फारसे लक्ष द्ययाची गरज नाही, अशी टीका शिवसेनेचे संजय राऊत यांनी नुकतीच केली होती. पाटील हे श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेटीला आज शुक्रवारी शेंगावला आले होते.

'इंधन दरवाढ कमी करण्याची किल्ली ही अजित दादांकडेच'

संपूर्ण देशात इंधनाचे दर वाढलेले असून, केंद्र सरकारने कमी केले पाहिजेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्याला उत्तर देताना भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, इंधन दर कमी करण्याची किल्ली ही अजित पवारांकडेच आहे. आणि क्रूड ऑइलच्या दराप्रमाणे दर बदलत असतात. तर, केंद्राने यापूर्वी अनेकवेळा इंधन दर कमी केले असून, राज्याने मिळणारे 35 पैशातून 10 पैसे कमी करावेत. म्हणजे इंधन दर कमी होईल. गोवा राज्याने दर कमी केले आहेत. कर्नाटक ने केले आहेत. गुजरातने कमी केले आहेत. तसे तुम्ही करा, आणि आता अजित पवार मोदींना शिकवणार का? असा प्रतिप्रश्नही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

'झोपलेल्यांना उठवणे सोपे आणि सोंग घेणाऱ्यांना कसे उठवणार'

दिल्लीमध्ये गेले 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करून आंदोलन सोडवावे. मात्र, त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. यावर भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी ही उत्तर दिले. झोपेलेल्या शेतकऱ्यांना उठवू शकतो. मात्र, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसे उठवणार? असा प्रश्न विचारला, आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांना कायदा मान्य आहे. महाराष्ट्रातही महाविकास नाही तर महाभकास सरकार आहे. आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त हुशार आहेत का? असा प्रश्नही चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकऱ्यांप्रती केला आहे. दरम्यान, खासदार नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही राजकीय सूडातूनच करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.

'आगामी निवडणुकात भाजप स्वबळावर लढणार'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत, कुठल्याही पक्षासोबत यावेळी युती करणार नसून, भाजप आता स्वतंत्र आगामी निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना युतीबाबत, भाजप मनसे युतीबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर पाटील यांनी आज पूर्णविराम लगावत कुठल्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details