महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा : समृद्धी महामार्गच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात; 13 मजूरांचा मृत्यू

By

Published : Aug 20, 2021, 4:44 PM IST

accident during samruddhi road construction

समृद्धी महामार्गच्या कामासाठी लोखंडी सळई भरुन मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भिषण अपघातात 13 मजूरांचा टिप्पर खाली दबून मृत्यू झाला आहे.

बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गच्या कामासाठी लोखंडी सळई भरुन मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भिषण अपघातात 13 मजूरांचा टिप्पर खाली दबून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास तळेगाव फाट्याजवळ घडली आहे. या अपघातात अन्य 3 मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे.

असा झाला अपघात-

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या डेपोतून समृद्धी महामार्गच्या कामासाठी आज शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लोखंडी सळई भरुन व मजूरांना घेऊन जात असताना सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव जवळील सुरू असलेल्या समृद्धी महामार्गावर एसटी बसला साईड देताना टिप्परवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टिप्पर पलटी झाला. यावेळी टिप्परवर बसलेले 16 मजूर टिप्पर व सळईच्या खाली दबल्याने या अपघातात 8 मजूर जागीच ठार झाले. तर रुग्णालयात उपचारादरम्यान 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अन्य 3 मजुरांची चिंताजनक -

शिवाय 3 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने किणगाव राजा, सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांची जलदगतीने मदत कार्य-

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत जलदगतीने मदत कार्य सुरू केले व मृतक व जखमींना बाहेर काढण्यात परिश्रम घेतले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते.

मृतकाची ओळख पटली नाही -

दरम्यान, या घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नसून हे मजूर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी जमली होती. तर मर्गावरील वाहतूकही काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

हेही वाचा - नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा, म्हणाले बाळासाहेबांचे आशीर्वाद डोक्यावर आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details