महाराष्ट्र

maharashtra

आमदार भोंडेकर यांचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कक्षाला टाळे ठोको आंदोलन

By

Published : Jan 4, 2020, 10:27 AM IST

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयावर शुक्रवारी (दि. 3 जाने.) भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह टाळे ठोको आंदोलन केले.

कुलूप ठोकताना आमदार नरेंद्र भोंडेकर
कुलूप ठोकताना आमदार नरेंद्र भोंडेकर

भंडारा- जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयावर शुक्रवारी (दि. 3 जाने.) भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह टाळे ठोको आंदोलन केले. संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा खरेदी केंद्राचे गोदामे भरल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडले आहेत आणि अवकाळी पावसात ते धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गोदामातील धानाची मिलिंग करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी कक्षाला ताला ठोको आंदोलन

1 नोव्हेंबरपासून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक आल्यामुळे आणि खरेदी केद्रांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध असलेले सर्व धान खरेदी केंद्राचे गोदामे पूर्णपणे भरले. गोदाम भरले असल्यामुळे शेतकऱ्याचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आल्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने यापैकी बराच धान ओला झाला, ओला झालेला हा धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले

धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर धान्याची उचल करून राईस मिलला मिलिंग करण्यासाठी दिले जाते. मात्र, मागील 2 महिन्यांपासून भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या तर्फे तशी परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गोदामे सध्या पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी थांबविण्यात आली आहे.

धानाची पिसाई करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, असे वारंवार अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी होकार देऊनही यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि गोदामातील धान्य उचल करण्याची परवानगी लगेच मिळावी, या मागणीसाठी आम्ही हा टाळे ठोको आंदोलन केल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - "शेतकर्‍यांची लूट थांबवण्यासाठी योग्य यंत्रणा राबविली जाईल"

Intro:Anc : जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयावर शुक्रवारी भंडारा चे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा खरेदी केंद्राचे गोदामे भरल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडले आहेत आणि अवकाळी पावसात ते धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गोदामातील धानाची मिलिग करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी करीत हा आंदोलन करण्यात आला. परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली.


Body:एक नोव्हेंबरपासून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक आल्यामुळे आणि खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध असलेले सर्व धान खरेदी केंद्राचे गोदामे पूर्णपणे भरले. गोदाम भरले असल्यामुळे शेतकऱ्याचे धान हे उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आल्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने यापैकी बराच धान ओल झाला, ओला झालेला हा धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होत आहे.
धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर धान्याची उचल करून राईस मिल ला मिलिंग करण्यासाठी दिले जाते मात्र मागील दोन महिन्यापासून भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या तर्फे तशी परवानगी दिली गेली नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गोदामे सध्या पूर्ण झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी थांबविण्यात आली आहे धानाची पिसाई करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी असे वारंवार अधिकार्यांना सांगण्यात आले मात्र प्रत्येक वेळेस होकार देऊनही यांनी टाळाटाळ केली आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि गोदामातील धान्य उचल करण्याची परवानगी लगेच मिळावी या मागणीला घेऊन आम्ही आज हा ताला ठोको आंदोलन केलं असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
बाईट : नरेंद्र भोंडकर, अपक्ष आमदार, भंडारा


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details