ETV Bharat / state

"शेतकर्‍यांची लूट थांबवण्यासाठी योग्य यंत्रणा राबविली जाईल"

author img

By

Published : Jan 4, 2020, 8:16 AM IST

जिल्ह्यात मागील तीन दिवसाअगोदर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे धान (भात) खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे विक्रीसाठी ठेवलेले धान पाण्यात भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

nana-patole-visits-paddy-shopping-center-in-bhandara
nana-patole-visits-paddy-shopping-center-in-bhandara

भंडारा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील भात खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी, भात खरेदी केंद्रचालक यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गोदामातील भात लवकरात-लवकर उचलावा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. धांकरी केंद्रावरील अडचण सुरळीत होण्यासाठी योग्य यंत्रणा राबविली जाईल. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दाखविला.

धान खरेदी केंद्राला भेट

हेही वाचा- 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'

जिल्ह्यात मागील तीन दिवसाअगोदर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे भात खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे विक्रीसाठी ठेवलेले भात पाण्यात भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भात केंद्रावर शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा व झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेण्याकरिता विधानसभा अद्यक्ष नाना पटोले यांनी नियोजित दौऱ्याचा माध्यमातून खरेदी केंद्राची पाहणी केली.

जिल्ह्यात १ नोहेंबर पासून भात खरेदीला सुरुवात झाली. याकरिता 64 हून अधिक आधारभूत भातखरेदी केंद्र नियोजित केले आहेत. मात्र, असे असले तरीही अनेक भात खरेदी केंद्रावर भात उघड्यावर ठेवले जाते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय भात खरेदी केंद्रावर शासनाचे निकष डावलून जास्त प्रमाणात भात खरेदी केले जाते. त्यामुळे एकीकडे अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी नाना पटोले यांनी भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यातील भात खरेदी केंद्रावर भेट देत शेतकऱ्यांचा समस्या जाऊन घेतल्या. तर शेतकऱ्यांनी देखील त्यांना प्रतिसाद देत आपल्या समस्यांचा पाढा वाचला.

सध्या जिल्ह्यातील सर्व भात खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल झाले आहेत, कारण मागील दोन महिन्यापासून या भाताची उचल करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली नाही. गोदामे हाउसफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे धान खरेदी केंद्राच्या बाहेर उघड्यावर ठेवावे लागत आहे. तसेच धांकरी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. भात खरेदी केंद्रावरील सर्व समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात एक सुरळीत यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबेल, असे नाना पटोले यांनी सांगितले. तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी आणि आमच्या भाताची उचल लवकरात लवकर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Intro:Body:Anc : - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांच्या धान खरेदी केंद्र चालकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच गोदाम मध्ये असलेले ध्यान लवकरात लवकर उचल करून त्याची भरडाई करावी असे आदेश नाना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले धांकरी केंद्रावरील अडचण सुरळीत होण्यासाठी विष्यात योग यंत्रणा राबविली जाईल त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबेल असा विश्वास त्यांनी यावेळी दाखविला.
भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसाअगोदर झालेल्या अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर शेतकर्यांतर्फे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या धानाचे पाण्यात भिजून नुकसान झाले असून याबाबत आधारभूत धान केंद्रावर शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा व झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेण्याकरिता विधानसभा अद्यक्ष नाना पटोले यांनी नियोजित दौऱ्याचा माध्यमातून खरेदी केंद्राची पाहणी केली.
जिल्ह्यात १ नोहेंबर पासून धान खरेदी ला सुरुवात झाली असून या करिता 64 हुन अधिक आधारभूत धान खरेदी केंद्र नियोजित केलेले आहे मात्र असे असले तरीही अनेक धान खरेदी केंद्रावर उघड्यावर धान ठेवले जाते त्यामुळे अवकाळी पावसामुळे दर वर्षी अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते शिवाय , या धान खरेदी केंद्रावर शासनाचे निकष डावलून जास्त प्रमाणात धान खरेदी केल्या जात असते त्यामुळे एकीकडे अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा या करिता आज नाना पटोले यांनी भंडारा , लाखनी व साकोली तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर भेट देत शेतकऱ्यांचा समस्या जाऊन घेतल्या तर शेतकऱ्यांनी देखील त्यांना प्रतिसाद देत आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
सध्या जिल्ह्यातील सर्व धान्य खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल झाले आहेत कारण मागील दोन महिन्यात पासून या धानाची उचल करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली नाही गोदामे हाउसफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे धान खरेदी केंद्राच्या बाहेर उघड्यावर ठेवावे लागतात आणि अवकाळी पावसामुळे त्याचा त्यांना फटकाही बसतो तसेच या धांकरी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू राहतो धान खरेदी केंद्रावरील सर्व समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात एक सुरळीत यंत्रणा राबविली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबेल असं नाना पटोले यांनी सांगितले. तर अवकाळी पावसामुळे आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी आणि आमच्या धानाची उचल लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
बाईट : नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष
बाईट १) प्रवीण मेंढे, शेतकरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.