महाराष्ट्र

maharashtra

भुजबळांचे बीडच्या सभेमधून चौफेर षटकार; जरांगे पाटील, सरकारला सुनावले

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:55 PM IST

Chhagan Bhujbal: बीड येथे आज (शनिवारी) महाएल्गार मेळावा घेण्यात आला. (Mahaelgar Melawa) यामध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्य सरकार आणि मराठा नेत्यांवर जोरदार निशाना साधला. (Maratha Reservation) मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसीमधून देऊ नका. वेगळं आरक्षण द्या, अशी ठाम भूमिका भुजबळांनी मांडली. (Jarange Patil)

Minister Chhagan Bhujbal
भुजबळ

छगन भुजबळ हे मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या प्रश्नांवर बोलताना

बीडChhagan Bhujbal: मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसीमधून देऊ नका. वेगळं आरक्षण द्या. चुकीचं आरक्षण देऊ नका. चुकीचे पायंडे पाडू नका, असं प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. बीड येथे आयोजित महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. (State Govt)

तर लायकी का काढता?छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर हे सारे प्रश्न निर्माण झालेच नसते. आज गोपीनाथ मुंडे आपल्यात नाहीत आणि ओबीसींच्या मागे संकटांची मालिका सुरू आहे. बीडमध्ये विचारपूर्वक प्लान करून जाळपोळ, हिंसाचार झाला. जाती धर्माच्या पलीकडची बंधुता ही देशाची, महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता अन् आपल्याच लोकांची घरं फुंकता हे शोभतं का? असा सवाल भुजबळ यांनी केला. देशाला-राज्याला विचार, वारसा, दिशा देण्याचे काम ओबीसींनी केलं आहे. या देशाला संविधान बाबासाहेबांनी दिलं आहे. त्यांच्यामुळे आज देश एकसंघ आहे, तरी तुम्ही आमची लायकी काढता? असा प्रश्न भुजबळांनी विचारला.

तर जनता कायदा हातात घेईल:बीडमध्ये मोठमोठे नेते आहेत; पण आज एल्गार सभेसाठी आम्ही छोटे छोटे लोक आहोत. अनेक जण बहाणे सांगताहेत. समोरच्या लोकांना अनेकजण बोलावून मदत देताहेत. आमच्या विरोधात शक्ती देणाऱ्यांना आम्ही जागा दाखवून देऊ असा इशारा भुजबळांनी दिला. कोणाच्याही विरोधात काहीही बोलायचं, गलिच्छ बोलायचं, तोंड दिलयं म्हणून काहीही बोलता, एवढी मस्ती कुठून आली? आणि हे सर्व होत असताना मी शांतता बिघडवली असं म्हणता! जाळपोळ कोणी केली, मारहाण कोणी केली? अजुनही ओबीसींना मारहाण होत आहे. आता यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस हात बांधून बसले तर जनता कायदा हातात घेईल असंही भुजबळ म्हणाले.

गुंडांना कोणाचा आशीर्वाद होता?आज जाळपोळ करणाऱ्या आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्यांचा सत्कार केला जातो, हे सारं काय आहे? मग या गुंडांना कोणाचा आशीर्वाद होता? असा सवालही भुजबळांनी केला. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण मिळणार नाही. चार चार आयोगांनी, सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठा समाजाचा दावा फेटाळला. तरी नवनवे आयोग आणले जात असल्याचा पुनरुच्चार देखील भुजबळ यांनी केला. रासपचे महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न छगन भुजबळ यांनी पूर्ण करावं असं सांगितलं.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसींनी इंग्रज, निजाम यांना देखील 'सळो की पळो' केलं होतं. वंजारी आणि धनगर हे ओबीसींच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाकं आहेत. यात ओबीसी, भटके विमुक्तच जिंकणार आहेत. ओबीसींच्या नेतृत्वाला सत्तेत स्थान मिळालं तर काय होतं हे गोपीनाथ मुंडेंनी दाखवून दिलं होतं. आता आमच्या नजरा छगन भुजबळांकडे आहेत आणि त्यासाठी आम्ही कायम लढत राहणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं. सभेला प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, टी. पी. मुंडे, नारायणराव मुंडे, केशव आंधळे, शकील अन्सारी, समीर भुजबळ, दीपक खैरे, 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा:

  1. लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा; ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा
  2. 'लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन'
  3. 'या' कारणामुळे चीनशी संबंध सामान्य होणं अशक्य, सीमा प्रश्नावर जयशंकर यांची भूमिका काय?

ABOUT THE AUTHOR

...view details