ETV Bharat / state

लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा; ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 9:00 PM IST

Updated : Jan 13, 2024, 9:21 PM IST

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (13 जानेवारी) कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. (Criticism on nepotism) यावेळी त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा काढत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. येत्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडण्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलंय.

In Kalyan Lok Sabha
उद्धव ठाकरे

ठाणे Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंंबईत येऊन घराणेशाहीवर टीका केली होती. ते चांगलंच आहे. पण घराणेशाहीविषयी वाटत असेल तर कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकिट मोदीच कापतील आणि त्यांना कचऱ्यात फेकतील. (PM Narendra Modi) ते काम त्यांच्याकडून झालं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना गद्दारांच्या घराणेशाहीला कचऱ्यात फेकण्याचं काम करावं लागेल, (MP Shrikant Shinde) असं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण दौऱ्याच्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना केलंय. (Kalyan LokSabha)

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद : कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ग्रामीण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा भागातील शिवसैनिकांशी शाखा भेटीच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी संवाद साधला. त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. इंडिया आघाडीची बैठक असताना आपणास शिवसैनिकांची भेट महत्त्वाची असल्यानं आपण इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगून या पूर्वनियोजित दौऱ्यावर आलो आहोत, असं ठाकरे यांनी सांगितलं.

तर ते काम शिवसैनिकांना करावं लागेल : येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेचं महत्त्व अधिक आहे. गद्दारांच्या घराणेशाहीतील उमेदवार या मतदारसंघात आहे. या गद्दारांच्या घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आपण या दौऱ्याचं आयोजन केलं. पंतप्रधान मोदींंनी मुंबईत शुक्रवारी घराणेशाहीवर टीका केली. ती गरज आहे; पण घराणेशाही विषयी मोदींंना खरंच काही वाटत असेल तर तेच कल्याण लोकसभेतील गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट कापतील. या गद्दारांना ते कचऱ्यात फेकतील. ते काम मोंदींकडून झालं नाही तर इथल्या शिवसैनिकांना ते काम निष्ठेनं करायचं आहे, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.


शिवसैनिकांची आपणास चिंता: मोदी पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आता मकर संक्रात आहे. तिळगुळ खाऊन गोड बोलण्यास सांगितलं जाईल. येत्या लोकसभा निवडणुकीत हुकुमशाहीवर संक्रात आहे हे नक्की. कल्याण लोकसभेतील शिवसैनिक निष्ठावान आहे. हे सिताराम भोईर यांनी एका गद्दाराला यापूर्वी पाडून दाखवून दिलं आहे. येथल्या शिवसैनिकांची आपणास चिंता नाही. ते कल्याण लोकसभेत गद्दारांना बरोबर गाडतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्याच दिवशी गद्दारांना गाडण्याची शपथ घ्या: आता साफसफाई जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी कार्पोरेट सफाई केली. राज्यात पण भाजपा आणि गद्दारांची सफाई निष्ठावान शिवसैनिक करतील. प्रभूराम चंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली की त्याच दिवशी शिवसैनिकांनी या गद्दारांना गाडण्याची शपथ घ्यायची आहे. हे पवित्र काम आपण नक्की पार पाडू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांंनी व्यक्त केला. कल्याण परिसरातील शिवसैनिकांना यंत्रणांचा वापर करून अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिकांना डिवचले तर मात्र मधाचे पोळे काय असते हे शिवसेना, भाजपाने समजून घ्यावे. आतापर्यंत या पोळ्यातील मध खाऊन पळून गेलात आहात याचे भान ठेवा. मधाचे पोळे येत्या निवडणुकीत तुम्हाला गाड्ल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

नाग पवित्र असतो पण हे गांडुळ: आतापर्यंत ज्यांना जोपासले, मोठे केले तेच नागासारखे उलटले. नाग पवित्र असतो पण हे गांडुळ आहेत. आपल्याला यांना जागा दाखवून द्यायचीच आहे. यासाठी सज्ज राहा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. कल्याण लोकसभेत आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. या विजयाची सभा अंबरनाथ शिवमंदिरा समोर घेतली जाईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवमंदिराचा विकास करताना बाजुचा दुर्गंधीयुक्त नाला यांना दिसला नाही का? तो नाला पण साफ करावा लागेल, अशी टीका ठाकरे यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केली.

हेही वाचा:

  1. नायलॉन मांजा वापराल तर खबरदार, मुंबई पोलिसांनी घातली बंदी
  2. उद्धव ठाकरे काळारामाचे नव्हे तर तळीरामाचे भक्त, आशिष शेलार यांची टीका
  3. 'लवासा जमीन घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढू' तलाठी भरती परीक्षेवरून विखे पाटील आक्रमक
Last Updated :Jan 13, 2024, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.