महाराष्ट्र

maharashtra

अखेर बीड जिल्ह्यातील 'तो' पूल गेला वाहून, सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By

Published : Sep 8, 2021, 2:24 AM IST

अखेर बीड जिल्ह्यातील 'तो' पूल गेला वाहून,
अखेर बीड जिल्ह्यातील 'तो' पूल गेला वाहून, ()

अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेलेल्या घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर या रोडवरील घोलपवाडीजवळील रेणा नदीवरील नळकांडी पूल जून(२०१६)मध्ये वाहून गेला. या घटनेला आता सहा वर्ष होत आली. मात्र, अद्यापही त्या पुलाची नव्याने उभारणी झाली तर नाहीच, मात्र, येथे साधे डागडुजीकडेही कुणी लक्ष दिलेले नाही. यावर्षी (दि.७ मंगळवार)रोजी रात्री झालेल्या पावसात तो संपूर्ण पुलच वाहून गेला आहे.

बीड - जिल्हयातील अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेलेल्या घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर या रोडवरील घोलपवाडीजवळील रेणा नदीवरील नळकांडी पूल जून(२०१६)मध्ये वाहून गेला. या घटनेला आता सहा वर्ष होत आली. मात्र, अद्यापही त्या पुलाची नव्याने उभारणी झाली तर नाहीच, मात्र, येथे साधे डागडुजीकडेही कुणी लक्ष दिलेले नाही. यावर्षी (दि.७ मंगळवार)रोजी रात्री झालेल्या पावसात तो संपूर्ण पुलच वाहून गेला आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अखेर बीड जिल्ह्यातील 'तो' पूल गेला वाहून,

या खराब रस्त्यामुळे गाड्या अनेकदा बस बंद ठेवल्या जातात

घाटनांदूर व परिसरातील बहुसंख्य व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा खरेदी व शेतमाल विक्रीच्या दृष्टीने लातूर येथील बाजारपेठेशी दररोज संपर्क येतो. या रोडवरून लातूर येथून घाटनांदूर येथे बसच्या दोन फेऱ्या तर परळी डेपोच्या जाणाऱ्या लातूर दोन फेऱ्या, बर्दापूर दोन फेऱ्या अशा बस चालतात. या खराब रस्त्यामुळे गाड्या अनेकदा बस बंद ठेवल्या जातात. घाटनांदूर व परिसरातील व्यापारी,दवाखाण्यात जाणारे आजारी व्यक्ती यांना जवळचा मार्ग म्हणजे घोलपवाडी, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर लातूर असा आहे. मात्र, हा मार्ग कंत्राटदार मंडळीने पूर्णपणे पोखरला असून, तब्बल पाच वर्षांपुर्वी जुनमध्ये या रोडवरील घोलपवाडी जवळील रेणा नदीवरील नळकांडी पुल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे भिंतीसह पूर्णपणे वाहुण गेला व सिमेंट पाईपही तुटून वेगळे झाले. त्यामुळे वाहनधारकांना जिव मुठीत घेवून वाहतुक करावी लागत आहे.

या रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमार दर्जाचे डांबरीकरन केले आहे

या परिस्थितीकडे गेली अनेक दिवसांपासून येथील प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. अखेर, हा संपूर्ण पुल रात्री झालेल्या पावसाने वाहुन गेला आहे. खजेवाडी लिंबगाव चोथेवाडी या गावचा संपर्क पूर्णपणे बंद झालेला आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागचा असला तरीही या रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमार दर्जाचे डांबरीकरन करून मलीदा लाटला आहे. तसेच, या रोडवर पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कोटयावधी रुपयाचे कामे झाली आहेत. तरीही हा रस्ता वाहतुकीसाठी घातकच आहे. कारण दोन-दोन तिन-तिन फुट खोलीचे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत.

अनेकदा दुचाकीस्वाराचे अपघात घडले

लातूरला जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर वाहनधारक करतात. या रोडमुळे वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मालाची नासधुस होत आहे. अनेकदा दुचाकीस्वाराचे अपघात घडले मोठी चारचाकी वाहने आडवी झाली. मात्र, कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. तब्बल पाच वर्ष होत आहेत. मात्र, सदरील घोलपवाडीजवळील पुल वाहून गेला मात्र कोणताही विभाग या कडे लक्ष देण्यास तयार नाही .जिल्हापरिषद बांधकाम विभाग असो की, सार्वजनिक बांधकाम विभाग असो प्रत्येकजन हाथ वर करीत आहे. एकाच रोडवर शेकडोवेळा काम,दुरूस्ती करणारे विभाग फक्त मलिदा लाटण्यात मश्गुल असून कंत्राटदार पोषण्याची वृत्ती या लोकांची गेलीच नाही.

पूल पूर्णपणे वाहून गेला आहे

रात्री झालेल्या पावसाने राहीलेला अर्धवट पुल पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे अनेक गावांचा घाटनांदूरशी संपर्क तुटला आहे. तब्बल सहा-सहा वर्षे पुलाचे नुकसान होवूनही लक्ष दिले गेले नाही. अखेर, पुल पूर्णपणे वाहून गेला आहे. या घटनेची याची तत्काळ चौकशी करा. तसेच, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा, न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असा इशारा अंबाजोगाई कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅड. इंद्रजीत निळे, संचालक बाबुराव जाधव यांनी दिला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details