महाराष्ट्र

maharashtra

मुंडे भगिनींना शह देण्यासाठी भागवत कराडांना मंत्रिमंडळात संधी?

By

Published : Jul 8, 2021, 7:20 PM IST

Updated : Jul 8, 2021, 9:29 PM IST

beed
संग्रहित फोटो

मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलले आहे.

बीड -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील याबाबत राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतले आहे. मराठवाड्यात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या गटाला भाजप जाणीवपूर्वक डावलत असल्याचा प्रत्यय यापूर्वी देखील वारंवार आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हेही वाचा -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात....पाहा व्हिडिओ

  • मुंडे भगिनींना शह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद?

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने घेतलेल्या मंत्र्यांच्या शपथ विधीनंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या भाजपमधील कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एवढेच नाही तर स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील ज्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली ती म्हणजे, प्रीतम मुंडे यांना कुठलेही मंत्रिपद मिळणार नाही. कारण आम्ही सर्व आमच्या मुंबई येथील घरी आहोत. त्यामुळे या खोट्या बातम्या आहेत, अशी काहीशी अस्वस्थ भावना पंकजा मुंडे यांना ट्विट करून सांगावी लागली. याचाच अर्थ भाजपमधील एका गटाने पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना डावलले आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता भाजपने एक नवीन खेळी खेळली आहे. ती म्हणजे औरंगाबाद येथील भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन वंजारी समाजाचे नेते भागवत कराड असू शकतात. असा संदेश देखील दिला असल्याचे राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी म्हणाले.

  • वंजारी समाजात नाराजीचा सूर -

बीड जिल्ह्यातील राजकारणाचे राज्यभर पडसाद उमटत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या घडामोडींमुळे माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे नेमकी काय भूमिका घेतात, हे कळण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. याशिवाय ज्या गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत भाजप पोहोचवली, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला पक्षाने मंत्री पदापासून दूर ठेवले असल्याची भावना वंजारी समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.

हेही वाचा -मोदी मंत्रिमंडळ २.० मध्ये 'या' मराठी चेहऱ्यांनी स्वीकारला पदभार

Last Updated :Jul 8, 2021, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details