महाराष्ट्र

maharashtra

Avinash Sable Wins Silver: अविनाश साबळेच्या राष्ट्रकुलमधील यशाने कुटुंबीय झाले भावूक, कष्टाचे झाले चीज

By

Published : Aug 7, 2022, 11:51 AM IST

Avinash Sable Wins Silver

Avinash Sable Wins Silver : 27 वर्षे धावपटू अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. ही वार्ता कळताच त्याच्या जिल्ह्यासह मराठवाड्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला, तर त्याच्या मेहनतीचा चीज झाले असल्याची अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी यावेळी दिली आहे.

बीड - 27 वर्षे धावपेटू अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. ही वार्ता कळताच त्याच्या जिल्ह्यासह मराठवाड्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. तर त्याच्या मेहनतीचा चीज झाले असल्याची ( Avinash Sable Wins Silver ) अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी यावेळी दिली आहे.

कुटुंबीयांना वाटला अभिमान -अविनाशच्या कामगिरीचा आनंद कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवून व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील मांडवा गावाचा अविनाश साबळे सुरुवातीपासून धावण्याच्या क्रीडा स्पर्धामध्ये आघाडीवर आहे. अविनाश याच्या यशाची बातमी अविनाशने आपल्या आई- वडिलांना दिली आणि त्यांना प्रचंड आनंद झाला होता. अविनाशचे आई आणि वडील हे आपल्या शेतात राहतात.

Avinash Sable Wins Silver

शेतात काम करत असताना रौप्य पदक मिळाल्याचा अविनाशचा फोन आला. या यशाने ते हरखून गेले. अविनाशचा फोन आल्यानंतर खूप आनंद झाला. आपल्या मुलाने खूप मोठे नाव कमावले. जीवनात कधी मुलगा इतकी मोठी कामगिरी करेल असे वाटले नव्हते. आपल्याला मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया अविनाशच्या वडिलांनी दिली आहे.

हेही वाचा -Dhule Murder : धुळे हादरलं! पैसे उसनवारीच्या वादातून गोळी झाडून चिन्नू पोपलीची हत्या, दोघांना अटक

हेही वाचा -August Kranti 2022 : 'ऑगस्ट क्रांती' ने ब्रिटीशांना हादरवून सोडले; जगात भारताची वेगळी ओळख बनवली

ABOUT THE AUTHOR

...view details