महाराष्ट्र

maharashtra

Beed District Central Cooperative Bank: बीड जिल्हा मध्यवर्ती बँक अपहार प्रकरणी 169 जणांविरोधात अटक वॉरंट जारी

By

Published : Nov 10, 2022, 10:38 PM IST

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Beed District Central Cooperative Bank) अपहार प्रकरणी 169 जणांना अटक ऑरंट जारी केला आहे. वडवणी न्यायालयाने या नोटीस बजावल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Beed district central bank embezzlement case).

Beed District Central Cooperative Bank
Beed District Central Cooperative Bank

बीड - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Beed District Central Cooperative Bank) अपहार प्रकरणी २०१३ साली १६९ जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. (Beed district central bank embezzlement case). सदरील प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक केली आहे. (Arrest warrant issued against 169 persons)

१६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी: जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले उखळ पांढरे केले होते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने १६९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. त्यापैकी तिघांना वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वडवणी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. उर्वरित आरोपींमध्ये वडवणीतील मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details