महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Visarjan 2023: छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत सर्वपक्षीय नेते उपस्थित, खैरेंच्या अनुपस्थितीनं पुन्हा चर्चा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 4:35 PM IST

Ganesh Visarjan 2023 : छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडलीय. या मिरवणूकीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, ओबीसी मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. परंतु चंद्रकांत खैरे अनुपस्थित होते. त्यामुळं पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

Ganesh Visarjan 2023
छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन

छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन

छत्रपती संभाजीनगरGanesh Visarjan 2023 : छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या आरतीनंतर मुख्य मिरवणूकीला सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थान गणपतीचं पूजन झाल्याशिवाय सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळ्याला सुरुवात केली जात नाही. हीच प्रथा यंदाही कायम ठेवण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मुख्य आरती पार पडली. त्यानंतर संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक रथामधून काढण्यात आली. यावेळी बँड पथकाच्या तालावर सर्वच राजकीय नेते भक्तांसोबत ठेका धरताना दिसून आले.


नेत्यांनी धरला बँडवर ठेका :पारंपारिक पद्धतीनं रथातून संस्थान गणपतीची प्रतिकृती असलेल्या तुरटीपासून तयार झालेल्या बाप्पाची मूर्ती विराजमान झाली. त्यानंतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रथ ओढून विसर्जन मिरवणूकीला सुरुवात केली. पारंपारिक पद्धतीनं सोहळा सुरू झाला. अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या चाळीसगाव येथील बँडनं सोहळ्यात रंगत आणली. बँडच्या तालावर सर्वच राजकीय नेत्यांनी सोबत ठेका धरला. ओबीसी नेते अतुल सावे आणि विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनीसोबत केलेला डान्स डॉ. कराड यांच्यासोबत खेळलेली फुगडी हा चर्चेचा विषय बनलाय. मात्र, गणेश उत्सव एकत्रित साजरा करण्याची परंपरा कायम आहे. ती तशीच राहावी, असा विश्वास असा विश्वास विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.



खैरे यांची अनुपस्थिती चर्चेत :ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच संस्थान गणपती विसर्जन मिरवणुकीत गैरहजर दिसले. त्यामुळं पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. चंद्रकांत खैरे हे संस्थान गणपतीला मानतात, त्यांच्या आशीर्वादानं सगळ्या शुभकार्यांची सुरुवात करतात. दरवर्षी सर्वात पुढे येऊन ते भक्तिभावानं पूजा करतात, इतकंच नाही तर विसर्जन मिरवणुकीत डान्सही करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. त्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी टीका केलीय. निमंत्रण देऊनही ते आलेले नाहीत, ते आता माजी खासदार आहेत. मात्र, त्यांना अजूनही ते खासदार असल्यासारखं वाटतं अशी टीका डॉ. भागवत कराड यांनी यावेळी केलीय.


2024 मधे पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार :2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, अशी मनोकामना डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलीय. बाप्पाचं विसर्जन करताना आम्ही नतमस्तक होऊन अभिवादन केलं. राज्याला सुजलाम सुफलाम करावं, भारत विश्व गुरु म्हणून पुढे यावा. आर्थिक स्थितीत भारत भक्कम होऊन, विश्वासाचा गुरु होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं. भारताने जगाला मार्गदर्शन करावं, अशी मनोकामना बाप्पाचरणी मागितली आहे. सात दिवस पाऊस झाल्यानं दुष्काळही दूर होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. Ganesh Visarjan २०२३ Pune : ढोल, ताशांचा गजर अन् जल्लोष; पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू
  2. Ganesh Visarjan २०२३ : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पाहा यंदाची राजाची शेवटची आरती
  3. Ganesh Visarjan २०२३ : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडं मार्गस्थ; भाविकांचा लोटला जनसागर

ABOUT THE AUTHOR

...view details