महाराष्ट्र

maharashtra

संशोधकांनी संत्र्यावर संशोधन करणे गरजेचे - आमदार देवेंद्र भुयार

By

Published : Oct 31, 2019, 3:17 AM IST

संत्र्यांचे उत्पादन जास्त असले तरी, या फळावरील रोगांवर कोणत्या उपाययोजना करायच्या या प्रश्नाबाबत शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हे उत्पादन धोक्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मार्गदर्शन मिळावे अशी मागणी आ. भुयार यांनी कृषी विभागाकडे केली.

संशोधकांनी संत्र्यावर संशोधन करणे गरजेचे - आमदार देवेंद्र भुयार

अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी - वरुड तालुका हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील अनेक शेतकरी हजारो हेक्टर जमिनीवर संत्र्याचे उत्पादन घेतात. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा बागांची पाहणी केली.

भुयार यांच्याकडून मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी

हेही वाचा -भाऊबीजेसाठी बहिण पाहत होती भावाची वाट; मात्र मिळाली त्याच्या हत्येची बातमी

संत्र्यांचे उत्पादन जास्त असले तरी, या फळावरील रोगांवर कोणत्या उपाययोजना करायच्या या प्रश्नाबाबत शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हे उत्पादन धोक्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मार्गदर्शन मिळावे अशी मागणी आ. भुयार यांनी कृषी विभागाकडे केली.

शासनाच्या व कृषी संशोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्यामुळे हे संकट उभे राहिल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संत्र्यावर सध्या शेंडेमर, संत्रा गळती, पानगळ, यांसारख्या अनेक रोगांची लागण झाल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, संत्र्याला अत्यल्प भाव, संत्रा गळती, अशा दृष्ट्चक्रात संत्री उत्पादक शेतकरी भरडला जात आहे.

Intro:आमदार देवेंद्र भुयार यांनी केली मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी.

संशोधकांनी संत्रावर संशोधन करणे गरजेचे -- आमदार देवेंद्र भुयार
-----------------------------------------------------------------
अमरावती अँकर
विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध
आहे .या भागात सर्वाधीक संत्रा उत्पादक शेतकरी असून हजारो हेक्टर जमिनीवर संत्रा पिकाचे उत्पादन घेतले जाते. परंतू शासनाच्या व कृषी संशोधकांच्या दुर्लक्षित पणामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या अज्ञात रोगावर काय उपाय योजना कराव्या हे माहित नसल्यामुळे संत्रा पीक धोक्यात आले असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांनी आज संत्रा बागांची पाहणी केली..

संत्रा वर सध्या शेंडे मर , संत्रा गळती , पानगळ , यासख्या अनेक अज्ञात रोगाने संत्रा बागांवर आक्रमण केल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे , संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत तीन वर्षांपासून संकटांची मालिकाच सुरु आहे गारपीट , ओला दुष्काळ , कोरडा दुष्काळ , अज्ञात रोगाची लागण , संतऱ्याला अत्यल्प भाव , संत्रा गळती , अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे .दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मार्गदर्शन करावे अशी मागणी आ भुयार यांनी कृषी विभागाच्या अधिकारी यांच्या कडे केली।Body:अमरावतीConclusion:अमरावती

ABOUT THE AUTHOR

...view details