महाराष्ट्र

maharashtra

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकाचा तीस वर्षांपासूनचा उपक्रम; एसटी बसवर तिरंगा लावत देशसेवेचा दिला संदेश

By

Published : Jan 26, 2023, 12:34 PM IST

Republic Day
सेवानिवृत्त शिक्षकाचा उपक्रम

अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसवर कागदाचा तिरंगा लावण्याचा उपक्रम सेवानिवृत्त शिक्षकाने राबविला. प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून सुटणाऱ्या या गाड्या प्रवाशांसह 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा शुभ संदेश घेऊन निघाल्या आहेत.

एसटी बसवर तिरंगा लावत देश सेवेचा दिला संदेश

अमरावती : खेळाडू असणारे संतोष कुमार अरोरा या सेवानिवृत्त शिक्षक यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. अमरावती आगारातील सर्व गाड्यांच्या काचावर आतल्या बाजूने सलग दोन दिवस संतोष कुमार अरोरा यांनी कागदाचे राष्ट्रध्वज चिटकवले. 1993 मध्ये त्यांनी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कागदाचे राष्ट्रध्वज भेट स्वरूपात वितरित केले होते. त्यावेळी दोनशे रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज त्यांनी खरेदी केले होते.

तीस वर्षांपासून उपक्रम सुरू :26 जानेवारी 1993 पासून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम पुढे भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही राष्ट्रीय सणाला सुरू झाला. आपल्या संत कव्हर राम विद्यालयासह संतोष कुमार अरोरा यांनी अमरावती शहरातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना कागदाचे झेंडे वितरित करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षातच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना कागदाचे झेंडे तसेच राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या तिरंग्याचे बिल्ले देखील वितरित केले. तीस वर्षांपासून सुरू असणाऱ्या त्यांच्या उपक्रमावर त्यांनी पाच ते सात लाख रुपये खर्च केले आहेत. विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत राहावे या उद्देशाने मी हा छोटासा उपक्रम राबवित असल्याचे संतोष कुमार अरोरा ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.



एसटी बस कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद :यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातून निघणाऱ्या सर्व गाड्यांवर राष्ट्रध्वज लावण्याचा उपक्रम संतोषकुमार अरोरा यांनी हाती घेतला. विशेष म्हणजे सलग दोन रात्री त्यांनी आगारात उभे असणाऱ्या गाड्यांवर कागदाचे राष्ट्रध्वज स्वतः चिटकवले. या उपक्रमात राज्य परिवहन महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना सहकार्य करून योग्य असा प्रतिसाद दिला. तसेच अमरावती जिल्ह्यातील एकूण 42 अंध अपंग आणि मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील संतोष कुमार अरोरा यांनी राष्ट्रध्वज वितरित केले आहे. या शाळेतील शिक्षकांना देखील त्यांनी हे झेंडे दिले आहेत. स्वातंत्र्यदिनी ऑटो रिक्षांवर लावले होते राष्ट्राध्यक्ष : 15 ऑगस्ट 2022 या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर संतोषकुमार अरोरा यांनी अमरावती शहरात धावणाऱ्या एकूण ऑटोरिक्षांपैकी 300 ऑटोरिक्षांवर कागदाचा राष्ट्रध्वज लावण्याचा उपक्रम राबविला होता. शहरातील ऑटो रिक्षा चालकांना त्यांनी हे राष्ट्रध्वज वितरित केले होते.

हेही वाचा :Republic Day 2023 आज 74 वा प्रजासत्ताक दिन वाचा या खास दिवसाचे महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details