महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत इम्पेरिया हॉटेलला आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

By

Published : Aug 31, 2021, 9:09 AM IST

Updated : Aug 31, 2021, 2:10 PM IST

अमरावतीत इम्पेरियाला आग लागली. यात दिलीप चंद्रकांत ठक्कर यांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. तर पोलिसांनी 5 जणांना वाचवले आहे. नागपूरचे दिलीप येथे कंपनीच्या कामानिमित्त आले होते.

Amravati
Amravati

अमरावती :अमरावती शहरात राजापेठ पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या हॉटेल इम्पेरियाला मध्यरात्री आग लागली. या आगीमुळे हॉटेलमध्ये धूर पसरला. या धुराने गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.

अमरावतीत इम्पेरिया हॉटेलला आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

हॉटेलमध्ये थांबलेल्या ग्राहकाचा गुदमरून मृत्यू

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. पाहटे साडेतीन वाजता ही घटना घडली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने गुदमरुन दिलीप चंद्रकांत ठक्कर (55) यांचा मृत्यू झाला. ठक्कर हे नागपूर येथील रहिवासी होते. जिटीपीएल कंपनीच्या बैठकीसाठी ते अमरावतीत आले असता ते हॉटेल इम्पेरिया येथे थांबले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी पाच जणांना वाचवले

गस्तीवर असणारे राजापेठ पोलीस ठाण्याचे पथक पहाटे 3.45 च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा पथकाला पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या हॉटेल राई जीरामधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेच हॉटेलमध्ये धाव घेतली. तत्पूर्वी अग्निशमन विभालाही माहिती दिली. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले असता तिसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे लक्षात आले. हॉटेलचा वीज पुरवठा बंद करून पोलीस तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. यावेळी तिसऱ्या मजल्यावर प्रचंड धूर होता. हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या पाच जणांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र दिलीप चंद्रकांत ठक्कर हे त्यांच्या खोलीबाहेर पडल्यावर त्यांना धूर दिसल्याने ते पुन्हा खोलीत पळाले. त्यांच्या खोलीतही धूर झाल्याने ते अस्वस्थ झाले. दिलीप ठक्कर हॉटेलमध्येच असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुन्हा तिसऱ्या मजल्यावर जाऊन दिलीप ठक्कर यांना खाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ठक्कर कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णलयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हॉटेलचे फायर ऑडिट नाही

अतिशय दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या हॉटेल इम्पेरिया येथे संकट काळात बाहेर निघायची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाला पाच जणांना वाचवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहितीही समोर येत आहे.

हेही वाचा -Video: मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली, अनेक वाहने अडकली

Last Updated : Aug 31, 2021, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details