महाराष्ट्र

maharashtra

'लोकांना कापण्यापेक्षा'; बच्चू कडूंचा छगन भुजबळांना सल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 5:32 PM IST

Bacchu Kadu on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यात रोजच वाकयुद्ध पाहायला मिळतंय. यात आता आमदार बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

अमरावती Bacchu Kadu on Chhagan Bhujbal : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून (Maratha OBC Reservation) राज्यभर रान उठलंय. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) व राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशात आता अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांना सल्ला दिलाय. हातपाय कापण्यापर्यंत संघर्ष नेण्याऐवजी हातपाय जोडण्याचं काम करायला हवं. हात-पाय तोडणं तर फार सोपं आहे. छगन भुजबळ यांनी राज्यात अनेक वर्ष सत्ता भोगली. त्यांनी कापण्यापेक्षा लोकांना जोडता कसं येईल याचा विचार करायला हवा, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.

ओबीसी नेत्यांना दिला इशारा : ओबीसीचे नेते कोण तायवाडे की तायडे आहेत, तेसुद्धा हात- पाय कापण्याची भाषा बोलत आहेत. त्यांनी जरूर हात-पाय कापावे. आम्ही मात्र हातपाय जोडत राहू, तुमची बुद्धी एवढी नीच स्तरावर गेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे देखील आमदार बच्चू कडू म्हणाले.

छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यायला हवा : शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी करणारे छगन भुजबळ हे राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. ते काही सरकार नाही, जर शिंदे समिती बरखास्त होत नसेल तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. कोकणातला कुणबी मराठा झाला. विदर्भातला कुणबी मराठा झाला. असे केवळ चार-पाच जिल्ह्यातलेच कुणबी मराठा होत नाही. मात्र, त्यासाठी मोठा वाजागाजा होत आहे. हा सर्व प्रकार राजकीय श्रेय घेणारा आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात बोलावं, 'ओके' सरकारमध्ये स्पष्टता नाही - सुप्रिया सुळे
  2. छगन भुजबळांनी जातिवाचक शब्द काढला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; जरांगेंची मागणी
  3. समाज भुजबळांवर नाराज, विधानसभेत फटका बसेल का

ABOUT THE AUTHOR

...view details