महाराष्ट्र

maharashtra

लोककला जागृत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात दिवाळीनिमित्त 'गवळणी नृत्य'!

By

Published : Nov 5, 2021, 4:19 PM IST

Updated : Nov 5, 2021, 5:10 PM IST

टीव्ही, मोबाईलमुळे पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला असलेल्या गवळणी नृत्याकडे लोकांनी पाठ फिरवली. असे असले तरी अमरावतीच्या ग्रामीण भागात आजही गवळणी नृत्याची परंपरा कायम आहे.

Gavlani
दिवाळीनिमित्त गवळणी नृत्य

अमरावती - पूर्वी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावोगावी गवळणींकडून लोकांचे मनोरंजन केले जात होते. परंतु कालांतराने मात्र टीव्ही, मोबाईलमुळे पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला असलेल्या गवळणी नृत्याकडे लोकांनी पाठ फिरवली. असे असले तरी अमरावतीच्या ग्रामीण भागात आजही गवळणी नृत्याची परंपरा कायम आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर, मोर्शी, नांदगाव पेठ, मोझरीसह अनेक गावात यंदाही दिवाळीच्या निमित्ताने गवळणी नृत्याचा उत्साह पाहायला मिळाला.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

यामध्ये पुरुष स्त्रीचे वस्त्र परिधान करून नृत्य करतो. या गवळणी नृत्याच्या माध्यमातून कोरोनाविषयी, तसेच स्वच्छताविषयी जनजागृती केली जात आहे. पुढील तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. एकीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर काही परंपरा असताना मात्र काही गावात दरवर्षी गवळणींचे आयोजन केले जाते.

काय आहे गवळण प्रकार? -

हेही वाचा -बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गवळण ही एक लोककला आहे. पूर्वी महाराष्ट्रात गवळण हे नवीन नव्हती, परंतु आता ती लोप पावत आहे. गवळणीसाठी गावातील लोक एकत्र येऊन एक संच तयार करतात. यामध्ये ढोलकी वादक, वीणा वादक, पिपारी वादकसह आदी लोकांचा समावेश राहतो. यामध्ये नृत्य करणारा पुरुष हा स्त्रीचे कपडे परिधान करून पायाला घुंगरू देखील बांधतो .हुबेहूब महिलांचा वेश परिधान, तसेच तो साज देखील करतो. यामध्ये ग्रामीण भागात गीत म्हटले जाते. या गीताच्या तालावर गवळण थिरकते. या गवळणीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी देखील होत असते. घरोघरी जाऊन गवळणीचे नृत्य केले जाते. या वेळी लोकांकडून धान्य व पैशांच्या स्वरूपात वर्गणी गवळणला दिली जाते.

दिवाळीनिमित्त गवळणी नृत्य

गवळणींकडून दिली जाते विविध योजनांची माहिती -

या गवळणींच्या माध्यमातून लोकांना सामाजिक प्रबोधन तसेच विविध योजनांची माहिती, कोरोनाची जनजागृती आदी गोष्टी या गवळणींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जातात. महाराष्ट्राची ही लोककला जिवंत राहण्यासाठी अनेक जण आजही गवळण काढतात.

दिवाळीनिमित्त गवळणी नृत्य

मोर्शी शहरात 400 वर्षाची परंपरा -

मोर्शीत धनत्रयोदशीच्या रात्रीपासून किमान ४ दिवस दररोज रात्री गवळण काढण्यात येते. स्त्रीरूपी माणूस आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. सोबतच शासकीय विविध योजनांची माहितीसुद्धा गावकऱ्यांना देण्यात येते. या मागचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी असा असतो. गवळणसोबत झेंडाई म्हणून ८५ दिव्यांची ज्योत जाळण्यात येते. संपूर्ण गावभर ही झेंडाई फिरवून घरोघरी त्याची पूजा केली जाते. जवळपास ४०० वर्षांपूर्वी पासून ही परंपरा जोपासण्यात येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवार पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थितीत; शरद पवारांनी दिले उत्तर

Last Updated :Nov 5, 2021, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details