ETV Bharat / bharat

बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला मला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By

Published : Nov 5, 2021, 10:38 AM IST

Updated : Nov 5, 2021, 4:58 PM IST

केदारनाथमध्ये 130 कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. यासोबतच 400 कोटींहून अधिक रकमेच्या कामांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली आहे. याठिकाणी पर्यटन सुविधा केंद्र निर्माण, आधुनिक रूग्णालय, रेन्ट सेंटर या सुविधा भाविकांसाटी उपलब्ध होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

केदारनाथ - केदारनाथला जेव्हाही येतो तेव्हा येथील कणाकणात मिसळून जातो. येथील हिमालय आणि बाबा केदारनाथ मला खेचून आणतात. काल सैन्यासोबत दिवाळी साजरी करायला मिळाली आणि आज गोवर्धन पूजेच्या दिवशी केदारनाथांचं दर्शन करण्याचा योग आला. एका दिव्य अनुभूतीचा अनुभव आला. शंकरांच्या डोळ्यांतून तेज प्रवाहित होत आहे. जे भव्य भारताचा विश्वास व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ येथे म्हणाले. 'जय बाबा केदार'च्या उद्गाराने पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली.

बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला खेचून आणतात

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आपला देश किती विशाल आहे, इतकी मोठी ऋषी परंपरा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक तपस्वी आध्यात्मिक चेतना जागृत करत आहेत.आज तुम्ही श्री आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे साक्षीदार आहात. भारताच्या अध्यात्मिक समृद्धी आणि रुंदीचे हे एक अतिशय अथांग दृश्य आहे. अनेक वर्षांपूर्वी केदारनाथ धाममध्ये एक दुर्घटना घडली होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला. लोकांना वाटायचं की आपलं केदारनाथ धाम पुन्हा उगवेल? पण माझा आतला आवाज सांगत होता की केदारनाथ धाम पूर्वीपेक्षा अधिक अभिमानाने आणि गौरवाने उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • I have regularly reviewed redevelopment works at Kedarnath from Delhi. I reviewed progress of different works being carried out here through drone footage. I want to thank all 'rawals' here for their guidance for these works: Prime Minister Narendra Modi at Kedarnath pic.twitter.com/jDmIDS2k9W

    — ANI (@ANI) November 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपला देश किती विशाल आहे, इतकी मोठी ऋषी परंपरा आहे. एकापेक्षा एक तपस्वी आजही भारताच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चेतना जागृत करत आहेत. जे आजही येथे आहेत. जर मी त्यांची नावे घ्यायला सुरुवात केली तर एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ जाईल, जर मी कोणाचे नाव घ्यायला विसरलो तर ते मोठे पाप होईल. मी कोणाचेही नाव न घेता सर्वांना नमन करतो. केदारनाथ हे अतिशय अलौकिक मंदिर असल्याचे पीएम मोदी म्हणाले. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा त्याच्या प्रत्येक कणाशी मी जडून जातो.

130 कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे उद्घाटन

केदारनाथमध्ये 130 कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. यासोबतच 400 कोटींहून अधिक रकमेच्या कामांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली आहे. याठिकाणी पर्यटन सुविधा केंद्र निर्माण, आधुनिक रूग्णालय, रेन्ट सेंटर या सुविधा भाविकांसाटी उपलब्ध होईल. यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील उपस्थित होते.

Last Updated :Nov 5, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.