महाराष्ट्र

maharashtra

आजीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या कारणाने नातवाकडून वडिलांची हत्या, अमरावतीच्या मोर्शीतील घटना

By

Published : Aug 7, 2021, 4:57 PM IST

Updated : Aug 7, 2021, 5:54 PM IST

मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटपूर या गावात पोटच्या मुलाने आपल्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली.

crime
आरोपीला पोलिसांनी केली अटक

अमरावती -जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटपूर या गावात पोटच्या मुलाने आपल्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडील आजीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या कारणामुळे नातवाने वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

आरोपी मुलाने मृताची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला होता. दरम्यान, शिरखेड पोलिसांनी आरोपी मुलाला चार तासातच अटक करून हत्येचा छडा लावला आहे. रमेश माणिकराव अकोटकर असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे.

हेही वाचा -धक्कादायक: जालन्यात दारुसाठी मुलानेच केली आईची हत्या

  • या कारणामुळे केली हत्या -

रमेश हे मागील काही दिवसांपासून वृद्ध आईवर वाईट नजरेने पाहत होते. त्यामुळे आपल्या वडिलांचे हे कृत्य पाहून आरोपी मुलगा संदीप अकोटकर व मृत वडील रमेश आकोटकर या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यातच आरोपी संदीप याला संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली.

  • अवघ्या चार तासात आरोपी अटकेत -

दरम्यान, घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संदीप आकोटकर हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मध्यरात्री पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या चार तासात त्याला अटक केली.

हेही वाचा -मुंबईत व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवण्याच्या नावाखाली फसवणूक

Last Updated : Aug 7, 2021, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details