ETV Bharat / city

मुंबईत व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवण्याच्या नावाखाली फसवणूक

author img

By

Published : Aug 7, 2021, 3:46 PM IST

उत्तर मुंबई समता नगर सायबर सेलने एअरटेल कंपनीचा व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

North Division Cyber ​​Police Thane
उत्तर विभाग सायबर पोलीस ठाणे

मुंबई - उत्तर मुंबई समता नगर सायबर सेलने एअरटेल कंपनीचा व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 10 ते 15 जणांची फसवणूक झाली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - देशाला सतत आगे बढो म्हणणारा कंडक्टरसारखा पंतप्रधान हवा; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्हॉट्सअॅप किंवा ईमेलवर लोकांना मेसेज पाठवत असत. जे लोकं त्यांच्या संपर्कात आले त्यांना ते व्हीआयपी नंबर देण्याविषयी बोलत असे. व्यक्तीनी व्हीआयपी क्रमांक मागितला असता आरोपी आधी त्यांना पैसे मागायचे, मात्र पैसे दिल्यानंतर नंबर मिळायचा नाही. असाच फसवणुकीचा प्रकार एका पीडितेशी झाला. तिच्या तक्रारीवरून उत्तर मुंबई समता नगर सायबर सेलमध्ये 3 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्हा नोंदवल्यानंतर, एपीआय अनुराधा पाटील यांनी तपास सुरू केला. सापळा रचून संतोष गुप्ता आणि प्रेसित नार्वेकर यांना कांदिवली ठाकूर हाऊसजवळ अटक करण्यात आली. सायबर सेलने आरोपींकडून एटीएम कार्ड, 6 मोबाईल फोन, 8 सिमकार्ड, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसेही जप्त केली. या दोघांच्या चौकशीदरम्यान, झैन अहमद खान (वय 24) आरोपीचीही माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी डोंबिवली परिसरातून अटक केली.

आरोपींनी आतापर्यंत 15 लाखांहून अधिक फसवणुकीचे प्रकार केले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून 1 लाख रुपयांचा डेटा जप्त करण्यात आला आहे. सायबर सेलने त्यांच्याकडून 2 लाख 10 हजारांची रोकड जप्त केली आहे.

हेही वाचा - तेजस ठाकरे बनणार का शिवसेनेचे आक्रमक बॅट्समन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.