महाराष्ट्र

maharashtra

Minor Girl Death Case: अनैसर्गिक कृत्यामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू‎; सव्वाचार वर्षानंतर ‘डीएनए’मुळे गुन्हा उघड

By

Published : Jun 30, 2023, 10:08 PM IST

परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय‎ मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला होता. सव्वाचार वर्षांपूर्वी झालेल्‍या या आकस्मिक मृत्यूप्रकरणी आता पोलिसांनी अनैसर्गिक कृत्य करणे, सदोष‎ मनुष्यवध आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा‎ दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे.

Minor Girl Death Case
अल्पवयीन मुलीचा मृत्यू

अमरावती :परतवाडा‎ पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणीसाठी पाठवलेला ‎अहवाल तब्बल सव्वाचार वर्षांनी प्राप्त झाला‎ आहे. त्यातून मृत मुलीवर अनैसर्गिक कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्‍यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी ‎स्वत: या प्रकरणात तक्रार नोंदवली.‎


असे आहे प्रकरण -नामदेव बळीराम दहीकर (३९, रा. म्हसोना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 ‎ ‎ फेब्रुवारी 2019 रोजी संबंधित आश्रमशाळेत‎ शिकणाऱ्या मेळघाटातील एका 14 वर्षीय‎ मुलीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला‎ होता. तिच्या पोटात व छातीत प्रचंड वेदना होत‎ होत्या व त्यामुळेच अति रक्तस्राव झाला.‎ त्यामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याबाबत‎ शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केले‎ होते. तसेच मृतक मुलीच्या शरीरावर काही‎ जखमा असल्याचेही अहवालात नमूद होते.‎


आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले :21 फेब्रुवारी 2019 रोजी संशयाच्या आधारे परतवाडा पोलिसांनी‎ नामदेव दहीकर याचे रक्ताचे नमुने घेतले होते. ते‎ रक्त नमुने तसेच मृतक तरुणीच्या शरीरावरील‎ स्वॅब घेऊन ‘डीएनए’चाचणीसाठी न्यायवैद्यक‎ प्रयोगशाळेत पाठवले होते. मृत मुलीच्या खासगी भागावर जखमा‎ असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद‎ होते. त्यावेळी त्याने या मुलीवर दुष्कृत्य‎ केल्याचे आता डीएनए अहवालातून समोर‎ आले आहे. त्या आधारे पोलिसांनी नामदेव दहीकरला अटक केली. घटनेनंतर 2020 मध्ये‎ आदिवासी विकास विभागाने संबंधित‎ शासकीय आदिवासी आश्रमशाळा बंद‎ करण्याचे आदेश दिले होते. तेव्‍हापासून ही‎ आश्रमशाळा बंद आहे.‎

पालक वर्गात रोष:या घटनेनंतर पालक वर्गात मोठा रोष पसरला आहे. दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी काही विद्यार्थिनींच्या दक्ष पालकांनी केली आहे. तुर्तास आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करीत आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न
  2. National Cyber Crime Portal : नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर 22 लाख तक्रारी, एफआयआर मात्र फक्त 43 हजार
  3. Ahmednagar Crime News: धक्कादायक घटना! किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप मॅनेजरची हत्या; एक जखमी, आरोपी फरार

ABOUT THE AUTHOR

...view details