महाराष्ट्र

maharashtra

Girl Dead Body Found : उच्चशिक्षित युवतीचा तिच्या घरातील पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

By

Published : Dec 3, 2022, 2:14 PM IST

Updated : Dec 3, 2022, 3:48 PM IST

Dead Body Of Girl Found In Water Tank

मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या अमरावतीतील अश्विनी गुणवंत खांडेकर (Ashwini Khandekar death case) या तरुणीचा मृतदेह (dead body of girl found in water tank) तिच्या घरातील पाण्याच्या टाक्यात आढळून आला. मृतक अश्विनी गुणवंत खांडेकर ही 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने 30 नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजेच्या दरम्यान दिली होती. Latest news from Amravati, Amravati crime. उच्चशिक्षित असणाऱ्या अश्विनीचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत गुढ कायम असून पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करीत आहेत. Girl Dead Body Found

अमरावती :शहरातील अर्जुन नगर परिसरात रत्नदीप कॉलनी येथे उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह (dead body of girl found in water tank) तिच्या घरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अश्विनी गुणवंत खांडेकर (Ashwini Khandekar death case) असे मृत युवतीचे नाव आहे. Latest news from Amravati, Amravati crime, Girl Dead Body Found


तीन दिवसांपासून होती बेपत्ता :मृतक अश्विनी गुणवंत खांडेकर ही 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने 30 नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजेच्या दरम्यान दिली होती. पाच फूट दोन इंच उंची असणाऱ्या अश्विनीचा शोध गत तीन दिवसांपासून तिच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिक घेत होते. शनिवारी दुपारी तिचा मृतदेह तिच्या घरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली.


अश्विनीच्या मृत्यूचे गुढ कायम :अभियंता असणारी अश्विनी खांडेकर तिच्या वडिलांचा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर मृत्यू झाला. अश्विनी ही आई आणि भावासह रत्नदीप कॉलनी येथील घरात रहात होती . आज दुपारी अश्विनीचे मामा नळाच्या पाण्याने तोंड धुत असताना त्यांना पाण्यातून दुर्गंध आल्याने त्यांनी घरावरची पाण्याची टाकी तपासली असता त्यामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. गाडगे नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमुले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा रत्नदीप कॉलनी परिसरात पोहोचला. श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन तासानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. उच्चशिक्षित असणाऱ्या अश्विनीचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत गुढ कायम असून पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करीत आहेत.

Last Updated :Dec 3, 2022, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details