महाराष्ट्र

maharashtra

Amol Mitkari : अमोल मिटकरींनी अमरावती येथील वृद्धाश्रमाला दिली भेट, म्हणाले- 'या संताच्या विचारामुळेच मी...'

By

Published : Nov 30, 2022, 3:46 PM IST

संत गाडगेबाबा हे माझे आवडते संत आणि या संताच्या विचारामुळेच मी आज आमदार झालोय अशी कबूली विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. वलगाव येथील संत गाडगे महाराज आश्रमाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.

Amol Mitkari
अमोल मिटकरी

अमरावती :विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वृद्धाश्रमाची पाहणी करून वृद्धांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील कामकाजाची आणि स्वच्छतेची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वृद्धाश्रमामध्ये इतर विकासात्मक काम करण्यासाठी स्थानिक विकास नियंत्रण पाच लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासने त्यांनी दिले.



अनोखी वैचारिक क्रांती : मिटकरी म्हणाले की, मी माझ्या लहानपणापासून कर्मयोगी गाडगे महाराज (Gadge Maharaj) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj) विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यामुळेच मी आमदार झालो आहे. गाडगे महाराजांच्या खराट्याची आणि तुकडोजी महाराजांच्या खंजिरीची आज जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे. या दोन्ही महापुरुषांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून एक अनोखी वैचारिक क्रांती घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

महापुरुषांचे विचार सर्वत्र पोहोचले पाहिजे : या महापुरुषांचे विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. गाडगे महाराजांच्या या निर्वाणभूमीत चाललेल्या असलेल्या वृद्धाश्रमामध्ये 30 वृद्ध आधाराला आहेत. त्यांच्या सुविधांकरता जे सहकार्य करता येईल ते वेळोवेळी करू. वृद्धाश्रमाच्या विकासाकरिता सदर व तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details