महाराष्ट्र

maharashtra

अकोल्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत

By

Published : Dec 1, 2020, 5:44 PM IST

अकोल्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले. अकोला जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी अकोला शहरात दोन मतदान केंद्र आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक
शिक्षक मतदारसंघ निवडणूक

अकोला - अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. अकोला जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी अकोला शहरात दोन मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांमध्ये पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग त्यासोबतच निवडणूक विभागाचे सर्व कर्मचारी हजर होते. या सर्वांच्या सहकार्याने याठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठीचे नियम काटेकोरपणे पाळले.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 36 हजार मतदार आहेत. हे मतदार निवडणुकीत उभे असलेल्या 27 उमेदवारांपैकी एकाला निवडून देणार आहेत. जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रावर मतदान पार पडले. अकोल्यातील आर. डी. जी. महाविद्यालय आणि जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात मतदान झाले.

मतदानाच्या दिवशी झाला आचारसंहितेचा भंग

विशेष म्हणजे मतदान केंद्राच्याबाहेर शिक्षक संघटना आणि भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंडप टाकले होते. प्रत्येक मतदारांची भेट घेऊन ते आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. मतदानाच्या दिवशीही उमेदवाराचे नाव घेऊन नमस्कार करण्याचा प्रकार मतदान केंद्रावर सर्रासपणे सुरू होता. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट होते.

मतदानाला सुरवात झाली तेव्हा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी घेतलेला आढावा-

शिक्षक मतदारसंघ निवडणूक

हेही वाचा- राज्यातील सर्व जागांवर भाजपचा विजय होईल - चंद्रकांत पाटील

हेही वाचा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा जातेगाव घाटात खून

ABOUT THE AUTHOR

...view details