महाराष्ट्र

maharashtra

ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये लस रक्कम दान करा.... सत्यजीत तांबे यांचे आवाहन

By

Published : Apr 28, 2021, 10:29 PM IST

महाराष्ट्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, पैसे देण्यास सक्षम असलेल्यांनी लसीची रक्कम दान करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले आहे.

सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे

शिर्डी (अहमदनगर) -महाराष्ट्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, पैसे देण्यास सक्षम असलेल्यांनी लसीची रक्कम दान करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लढ्यात अत्यंत महत्वपूर्ण काम केले असून नव्याने 18 ते 44 वयोगटाच्या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण याचा घेतलेला निर्णय चांगला असून हा सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे. तरीही यांना शक्य आहे त्यांनी कोरोना लस घेताना मुख्यमंत्री सहायता निधीला सगळे हाताने मदत करावी. सध्या रायात कोरोनाचे मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. यावरून राजकारण होत आहे. या सर्व परिस्थितीवर सरकार आतिशय सक्षमपणे मार्ग काढत आहे .ऑक्सिजनच्या पुरवठ्याची तूट कमी करण्याकरता कोरोना रुग्ण कमी करणे हे सर्वांना पुढील आव्हान आहे. यासाठी प्रत्येकाने शासकीय नियम पाळा. काही आजारांची लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्या. कोणीही निष्काळजीपणा करू नका.आपण सुरक्षित राहिला तर आपले कुटुंब सुरक्षित राहील. हा मानवावरील संकटाचा मोठा काळ आहे. यामध्ये सुरक्षितता हेच प्रभावी शस्त्र आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

हेही वाचा -श्रीरामपूरमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची विदेशी दारू जप्त; दारु उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details