अहमदनगर :शेती करताना येणाऱ्या अनेक अडचणी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुले पाहत होती. बेड तयार करने, त्यावर मल्चिंग पेपर अंथरणे, ड्रिपची नळी टाकने आणि रोप लावने ही कामे करतांना अनेक अडचणी येतात. तसेच वेळ जास्त लागणे, आणि पैसाही जास्त खर्च होतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेवुन कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 25 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या टीमने स्वयंचलित बहू रोप पेरणी यंत्र तयार केले आहे.
फोरर इन वन यंत्र :संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या शेतकरी कुटुंबातील 25 विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टरला जोडून सर्व कामे एकाच वेळी कशी करता येईल, असा विचार करुन एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरवशावर रोपाची लागवड करता येणार आहे. याचबरोबर रोपाभोवती मल्चींगपेपर अंथरता येणार आहे. रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरवीता येणार आहे, असे स्वयंचलित बहू रोप पेरणी यंत्र तयार केले आहे.
यंत्र बनवण्यासाठी लागले सात महिने :हे यंत्र बनविण्यासाठी गेली सात महीने या मुलांनी मेहनत केली. केवळ 65 हजार रुपयांत हे फोरर इन वन यंत्र बनवले आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्व्हे करून हे यंत्र तयार केले आहे. माझे आई वडील शेतकरी असून आमची 25 एकर शेती करताना मजूर मिळत नव्हते. त्यामुळे आज यंत्र बनविल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. यात वेळेसह पैशाचीही बचत होणार असल्याचे यंत्र बनवणारे विद्यार्थी म्हणाले आहे.