महाराष्ट्र

maharashtra

दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन, संगमनेरमध्ये रस्त्यावर ओतलं दूध

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 11:01 PM IST

Demand Increase Milk Price : अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज शेतकऱ्यांनी संगमनेर शहरात दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केलं. दुधाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.

Demand Increase Milk Price
Demand Increase Milk Price

दूध दरवाढीसाठी रस्त्यावर ओतूलं दूध

संगमनेरDemand Increase Milk Price :दुधाच्या दरात झालेली घसरण तसंच चाऱ्याच्या दरात सातत्यानं होणारी वाढ यामुळं शेतकरी हतबल झाला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत किसान सभा तसंच दूध शेतकरी संघर्ष समितीनं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलीआहे.

दूध दरवाढ करण्याची मागणी :यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दुधाला किमान 34 रुपये भाव मिळावा, जनावरांच्या चाऱ्याची किंमत कमी करावी, मिल्को मीटर, वजन काटे नियमित तपासावेत, दूध भेसळ रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. संगमनेर शहरातून मोठा मोर्चा काढून शेतकऱ्यांनी दंडाधिकारी कार्यालयावर नेला. यावेळी शेतकऱ्यांनी शासन, दूध कंपन्यांचा निषेध करत घोषणाबाजी केली.



दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी आक्रमक : दुधाच्या दरातील चढ-उतारामुळं निर्माण झालेली अस्थिरता संपवण्यासाठी दुग्धविकास विभागानं दूध खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीनं दर तीन महिन्यांनी दुधाचा खरेदी दर ठरवावा, अशी मागणी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं केली होती. त्यानुसार दुधाचा दर 34 रुपये जाहीर करण्यात आला होता. मात्र, दूध कंपन्यांनी ऐनवेळी दर कमी केल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

राज्य सरकारला गंभीर इशारा : मात्र आता कंपन्यानी दुधाचा दर 34 रुपयाऐवजी 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. दुध संघ, दुध कंपन्या संगनमत करून दर खाली आणत असल्याचा आरोप किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे. लुटमारीला लगाम लावण्यासाठी तसंच पशुखाद्याचा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी डॉ. अजित नवले यांनी म्हटलंय. 30 नोव्हेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयात दुध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. यानंतर आज 5 डिसेंबर रोजी संगमनेर प्रांत कार्यालयात दुध ओतून आंदोलन करण्यात आलं. सरकारनं तरीही दाद न दिल्यास मंत्रालयात दुध ओतावं लागेल, असा इशारा यावेळी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.


हेही वाचा -

  1. लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू होणार, महिलांना मिळणार 1 हजार 250 मानधन
  2. मराठी पाट्यासाठी मनसेचा अल्टिमेटम, 809 जणांवर कारवाई; आठ लाखांचा दंड वसूल
  3. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून फूट? तिघांचाही मुख्यमंत्री पदावर दावा

ABOUT THE AUTHOR

...view details