महाराष्ट्र

maharashtra

Shirdi Sai Baba Temple : साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगे लगत बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ

By

Published : Dec 26, 2021, 3:52 PM IST

Updated : Dec 26, 2021, 7:29 PM IST

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी ( Shirdi Sai Baba Darshan )भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये दोन नंबर गेटच्या दर्शन रांगेत एक लाल रंगाची बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक ( Bomb Detector squad in shirdi ) आणि नाशक पथकाने या बँगची तपासणी केल्यानंतर, त्यामध्ये फक्त कपडे आढळून आल्याने भाविक सुटकेचा निश्वास सोडला.

Saibaba Temple
साईबाबा मंदिर

शिर्डी : नाताळाच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने आज (२६ डिसेंबर) शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी ( Large crowd for darshan of Sai Baba ) भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. याच दरम्यान साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मुख्य दर्शन रांगेला खेटून असलेल्या डिव्हायडरवर एक लाल रंगाची बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. साईबाबांच्या मंदिरालगत असलेल्या पिंपळवाडी रोड आणि साईबाबांच्या मंदिरात जाणाऱ्या दोन नंबर गेटच्या दर्शन रांगे लगत डिव्हायडरवर एक बेवारस लाल रंगाची पाठीवरील प्रवासी बॅग असल्याचे साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या (Sai Mandir Security Staff ) लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा - Shirdi Darshan New Rule : शिर्डीत साईदर्शनाकरिता नवीन नियमावली: 'या' वेळेत भाविकांना मिळणार साई दर्शन


त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांसह शिर्डीतील बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तात्काळ दाखल झाले होते. या पथकाने तेथे येऊन या बॅगची डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक मशीनद्वारे त्याची तपासणी सुरु केली. पिंपळवाडी रोडवर साईभक्तांची मोठी गर्दी आणि दर्शन रांगेतील गर्दी या गदारोळातच या बॅगची तपासणी सुरु होती. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने या बॅगची तपासणी केल्यानंतर या बॅगेत काहीही आढळून आले नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदर बॅगमध्ये फक्त कपडे आढळून आले. त्यामुळे ही बॅग साई संस्थानच्या सुरक्षारक्षकाने सुरक्षा कार्यलयात जमा केली आहे.

Last Updated : Dec 26, 2021, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details