ETV Bharat / state

Shirdi Darshan New Rule : शिर्डीत साईदर्शनाकरिता नवीन नियमावली: 'या' वेळेत भाविकांना मिळणार साई दर्शन

author img

By

Published : Dec 26, 2021, 2:43 AM IST

Updated : Dec 26, 2021, 3:12 AM IST

सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत भाविकांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी ( rule for entry in Sai Temple ) सोडण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत ( CEO Shirdi Trust Bhagyashree Banayat ) यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे साईबाबांची रात्रीची शेजाआरती व सकाळच्या काकड आरतीसाठी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

शिर्डी साई मंदिर
शिर्डी साई मंदिर

अहमदनगर - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी ( New timings of Sai Darshan ) लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा आपत्ती विभागानदेखील रात्रीची संचारबंदीचे ( Night Curfew in Ahmednagar ) आदेश जारी केले आहे. या आदेशाचे पालन करत शिर्डी साईबाबा संस्थाने रात्री 9 ते सकाळी 6 यावेळात भाविकांना साई मंदिरात प्रवेशबंदीचा ( entry in Sai Temple ) निर्णय घेतला आहे.

सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत भाविकांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी ( rule for entry in Sai Temple ) सोडण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत ( CEO Shirdi Trust Bhagyashree Banayat ) यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे साईबाबांची रात्रीची शेजाआरती व सकाळच्या काकड आरतीसाठी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

सरकारच्या नवीन आदेशामुळे नियमात बदल

हेही वाचा-Vaccination Weekly Market : लसीकरणासाठी प्रशासन उतरले थेट आठवडे बाजारत

सरकारच्या नवीन आदेशामुळे साई संस्थानकडून नियमात बदल

साई मंदिरातील मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साईबाबांची शेजाआरती आणि काकड आरती पार पडणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सरकारच्या नवीन आदेशामुळे हे नियम साई संस्थांनतर्फे करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

हेही वाचा-Varsha Gaikwad On Schools Closing : सरसकट शाळा बंद करणार नाहीच, बंद ठेवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला : वर्षा गायकवाड

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच ओमीक्रॉनच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कडक उपाययोजना व निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारच्या नवीन आदेशान्वये साईबाबा संस्थाननेही साईभक्तांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. 25 डिसेंबरला रात्री 9 वाजल्यापासून या निर्णयाची संस्थानद्वारे अंमलबजावणी सुरू झाली आहे.

भाविकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

साई मंदिरात साडेदहा वाजता होणारी शेजारती तसेच पहाटे होणारे साडेचारची काकड आरतीसाठी भाविकांना मंदिरात सोडले जाणार नाही. तसेच साई प्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅन्‍टींन आदी सुविधा 9 वाजल्यानंतर बंद राहणार आहेत. भाविकांनी कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन करावे साईंच्या मंदिरात दर्शन घेताना साईसंस्थांनने ठरवून दिलेल्या नियमांचे भाविकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही साई संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा-Corona in Ahmednagar : टाकळी ढोकेश्वरच्या जवाहर नवोदय निवासी विद्यालयातील 16 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोनाबाधित

Last Updated : Dec 26, 2021, 3:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.