महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Paralympics : प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि सुहास यथिराज अंतिम फेरीत

By

Published : Sep 4, 2021, 3:21 PM IST

Updated : Sep 4, 2021, 3:39 PM IST

प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि सुहास यथिराज यांनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहे. तर मनोज सरकार आणि तरूण ढिल्लो यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. प्रमोद, कृष्णा आणि सुहास यांचे पदक निश्चित झालं आहे.

tokyo paralympics : pramod Bhagat, Suhas  Yathiraj, Krishna nagar enter badminton finals; Manoj, Tarun lose in semifinals
Tokyo Paralympics : प्रमोद भगत, कृष्णा नागर, सुहास यथिराज अंतिम फेरीत

टोकियो - भारताचे तीन खेळाडू प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि सुहास यतिराज यांनी आज टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहे. तर मनोज सरकार आणि तरूण ढिल्लो यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला.

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आणि आशियाई चॅम्पियन 33 वर्षीय प्रमोद भगत याने एसएल3 गटामध्ये जपानच्या दाइसुके फुजीहारा याचा 36 मिनिटात 21-11, 21-16 अशा धुव्वा उडवला. या विजयासह भगत पॅराऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या बॅडमिंटन खेळात अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरला. अंतिम सामन्यात त्याचा सामना ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी होणार आहे.

एसएल4 गटात सुहास यथिराज याने इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावान याचा 31 मिनिटात पराभव केला. त्याने हा सामना 21-9, 21-15 अशा फरकाने जिंकला. अंतिम सामन्यात त्याचा सामना फ्रान्सच्या लुकास माजूर याच्याशी होणार आहे.

दुसऱ्या मानांकित कृष्णा नागर याने ब्रिटनच्या क्रिस्टिन कुम्ब्स याचा एसएच6 गटात 21-10, 21-11 ने पराभव केला. अंतिम सामन्यात त्याची गाठ हाँगकाँगच्या चु मान केइ याच्याशी होणार आहे.

मनोजचा पराभव

मनोज सरकारचा उपांत्य फेरीत पराभव झाला. दुसऱ्या मानांकित बेथल याने मनोजचा 21-8, 21-10 ने पराभव केला. मनोज आता कास्य पदकासाठी फुजीहारा सोबत सामना खेळणार आहे.

संघर्षपूर्ण सामन्यात तरूणचा पराभव

एसएल4 गटाच्या उपांत्य फेरीत तरूण ढिल्लोला संघर्षपूर्ण सामन्यात पराभव पत्कारावा लागला. त्याला दुसऱ्या मानांकित खेळाडूने 21-16, 21-18 अशा फरकाने धूळ चारली. 27 वर्षीय तरूण आता कास्य पदकासाठी सेतियावान याच्याशी भिडणार आहे.

हेही वाचा -IND vs ENG: जेम्स अँडरसनने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम

हेही वाचा -टोकियो पॅरालिम्पिक : नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदक पटकावले

Last Updated :Sep 4, 2021, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details