टोकियो पॅरालिम्पिक : नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदक पटकावले

author img

By

Published : Sep 4, 2021, 9:36 AM IST

Updated : Sep 4, 2021, 9:59 AM IST

Indian shooters Manish Narwal and Adana Singhraj win gold and silver respectively

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज नेमबाज मनिष नरवालने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर सिंहराज अधानाने रौप्य पदक जिंकले आहे.

टोकियो - भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर सिंहराज अधानाने रौप्य पदक जिंकले आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून आतापर्यंत त्यांनी 15 पदके जिंकली आहेत.

मनिष नरवालने शूटिंग P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 इव्हेंटमध्ये 218.2 अंकानी सुवर्ण पदक जिंकले. तर सिंहराजने P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 इव्हेंटमध्ये 216.7 अंकानी रौप्य पदक पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोघांनाही टि्वट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

दोन्ही नेमबाज फरीदाबादचे रहिवासी आहेत. 19 वर्षीय मनीष नरवाल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरे सुवर्ण पदक दिले. यापूर्वी अवनी लाखेरा (महिला 10 मीटर एअर रायफल SH1) आणि सुमित अंतिल (पुरुष भाला फेक F64) यांनी सुवर्णपदके जिंकली होती. भारताने सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत 15 पदके जिंकली आहेत. भारताकडे आता 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने रिओ पॅरालिम्पिक (2016) मध्ये 2 सुवर्णांसह एकूण 4 पदके जिंकली होती. 2016 च्या तुलनेत यंदा टोकियोत भारताने उलेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा - Tokyo Paralympics : टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने जिंकले रौप्य पदक

Last Updated :Sep 4, 2021, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.