महाराष्ट्र

maharashtra

Asia Cup : दक्षिण कोरियाला हरवून भारत आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उतरणार

By

Published : May 31, 2022, 4:13 PM IST

INDIA
INDIA

भारत विरुद्ध दक्षिण कोरिया सामना 5 वाजता स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स सलेक्ट 2 एचडीवर लाइव्ह पाहता येईल. दक्षिण कोरियाला हरवून भारत आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उतरणार आहे.

जकार्ता: गतविजेता भारत आशिया चषक ( Asia Cup ) पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या इराद्याने आज सुपर 4 टप्प्यातील अंतिम फेरीतील रॉबिन साखळी सामन्यात दक्षिण कोरियावर मात करेल. रविवारी मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताने आधीच विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते, मात्र राझी रहीमने हॅट्ट्रिक करत भारताला ३-३ अशा बरोबरीत रोखले. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने जपानचा 2-1 असा पराभव केला होता.

सुपर 4 गुणतालिकेत कोरिया प्लस टूच्या गोल फरकासह अव्वल स्थानावर आहे, तर भारत एका गोलच्या फरकासह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन सामने गमावल्यानंतर, जपान शर्यतीतून बाहेर आहे, तर मलेशियाला जपानला किमान दोन गोलने पराभूत करण्याची संधी आहे, जर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. कोरियाला हरवून जर तरची फेरी टाळण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल. बरं हे आव्हानही तितकं सोपं नाही. सुपर 4 टप्प्यात कोरियाने मलेशियाला 2-2 असे बरोबरीत रोखले आणि जपानचा 3-1 असा पराभव केला.

पहिल्या दोन पूल सामन्यांनंतर भारतानेही आपल्या खेळात बरीच सुधारणा केली आहे. यजमान इंडोनेशियाला 15 गोलच्या फरकाने पराभूत करण्याचे अशक्यप्राय ध्येय गाठून सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. यानंतर जपानचा 2-1 असा पराभव केला, त्यांच्याकडून प्राथमिक टप्प्यात 2-5 असा पराभव झाला होता. रविवारी मलेशियाविरुद्ध, भारताने दोन गोलने पिछाडीवरुन पुनरागमन करताना 3-2 अशी आघाडी घेतली, पण शेवटच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरवर रहीमने गोल करत मलेशियाला बरोबरी साधून दिली.

उत्तम सिंग, एसव्ही सुनील आणि पवन राजभर यांनी भारतीय फॉरवर्ड लाईनमध्ये प्रभावी कामगिरी केली. गेल्या सामन्यात राजभरच्या पासवर सुनीलने गोल केला होता. भारतीयांनी अनेक संधी निर्माण केल्या मात्र स्ट्रायकर त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाहीत. मुख्य प्रशिक्षक सरदार सिंग ( Head Coach Sardar Singh ) हे सुधारणा करू इच्छित आहेत. बिरेंदर लाक्राच्या नेतृत्वाखालील बचावाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे, ज्याने मलेशियाविरुद्ध अनेक पेनल्टी कॉर्नर गमावले होते.

हेही वाचा -Analysis Virat vs Jos : विराट कोहली आणि जोस बटलरच्या एका आयपीएल हंगामातील कामगिरीची तुलना

ABOUT THE AUTHOR

...view details