ETV Bharat / sports

घरच्या मैदानावर चेन्नईच 'किंग्ज'! राजस्थानचा पाच गडी राखून उडवला धुव्वा, प्लेऑफमधील स्थान मजबूत - CSK vs RR

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 3:33 PM IST

Updated : May 12, 2024, 7:20 PM IST

IPL 2024 CSK vs RR : आयपीएलच्या 61 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आहे. हा सामना जिंकत प्लेऑफचं तिकीट पक्क करण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.

IPL 2024 CSK vs RR
IPL 2024 CSK vs RR (Desk)

चेन्नई IPL 2024 CSK vs RR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 61व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) नं राजस्थान रॉयल्सचा (RR) पाच गडी राखून पराभव केलाय. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं यजमान संघाला विजयासाठी 142 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी 18.2 षटकांत पूर्ण केलं. चालू हंगामातील 13 सामन्यांमधला सीएसकेचा हा सातवा विजय ठरला. गुणतालिकेत ते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडं राजस्थान रॉयल्सचा 12 सामन्यांमधला हा चौथा पराभव ठरला.

गायकवाडची संयमी खेळी : चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडनं 41 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि एक चौकार समाविष्ट होता. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराजनं शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजयापर्यंत नेलं. सलामीवीर रचिन रवींद्रनंही 18 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं 27 धावा केल्या. राजस्थानसाठी आर अश्विननं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्जर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रियान परागमुळं सन्मानजनक धावसंख्या : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 5 गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागनं सर्वाधिक 35 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी खेळली. रियननं या खेळीत तीन षटकारांसह एक चौकारही मारला. तर ध्रुव जुरेलनंही 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 28 धावांची खेळी केली. सीएसकेकडून सिमरजीत सिंगनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर तुषार देशपांडनं दोन बळी संपादन केले.

दोन्ही संघात मोठे बदल : या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. चेन्नईनं मिचेल सॅन्टनरच्या जागी श्रीलंकेचा फिरकीपटू महिश तिक्शिनाचा संघात समावेश केला. तर ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग 11 मध्ये परतला. हा सामना जिंकून राजस्थान संघाचा प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

हेड टू हेड रेकॉर्ड : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जनं 15 सामने जिंकले, तर राजस्थान रॉयल्सनं 13 सामने जिंकले. जेव्हा दोन्ही संघ मागील सामन्यात आमनेसामने आले होते, तेव्हा सीएसकेनं 32 धावांनी विजय मिळवला होता.

  • चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग 11 : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिश तिक्षीना.
  • राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

हेही वाचा :

  1. मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करत केकेआर ठरला प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ - KKR vs MI
  2. एका युगाचा अंत! इंग्लंडच्या महान वेगवान गोलंदाजाची रिटायरमेंट घोषणा; सचिनचा 'हा' विक्रम राहणार अबाधित - James Anderson
Last Updated :May 12, 2024, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.