महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र झाझरिया आणि व्यंकटेश प्रसाद यांचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश

By

Published : Sep 8, 2021, 5:30 PM IST

Updated : Sep 9, 2021, 8:14 PM IST

देवेंद्र झाझरिया याचा यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुंदकम शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. झाझरियासोबत भारताचे माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांचा देखील समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

devendra jhajharia-and-venkatesh-prasad-included-in-selection-committee-for-national-sports-awards
देवेंद्र झाझरिया आणि व्यंकटेश प्रसाद यांचा क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश

मुंबई -तीन वेळचा पॅरालिम्पिक पदक विजेता देवेंद्र झाझरिया याचा यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुंदकम शर्मा यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपण्यात आले आहे. झाझरियासोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा देखील समितीमध्ये समावेश करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी बॉक्सिंगपटू सविता देवी, हॉकी संघाचे प्रशिक्षक बलदेव सिंह, माजी रायफल शूटर अंजली भागवत आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा देखील निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

देवेंद्र झाझरिया याने आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, क्रीडा मंत्रालयाने मला यासाठी योग्य समजलं, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

दरम्यान, देवेंद्र झाझरिया याने नुकतेच संपलेल्या टोकियो पॅराऑलिम्पिकमधये रौप्य पदक जिंकले. त्याआधी त्याने 2004 आणि 2016 पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती पुढील काही दिवसांत विजेत्या खेळांडूची घोषणा करणार आहे. यावर्षी सरकारने टोकियो ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेमुळे हे पुरस्कार लांबणीवर टाकले होते.

निवड समितीमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी संदिप प्रधान, पत्रकार विक्रांत गुप्ता आणि विजय लोकपल्ली यांचा देखील समावेश आहे.

भारताने यंदा ऑलिम्पिकमध्ये 7 तर पॅरालिम्पिकमध्ये 5 सुवर्ण पदकासह 19 पदके जिंकली. यावर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आलं आहे.

खेलरत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपयाचे बक्षीस दिले जाते. तर अर्जुन पुरस्कारला 15 लाख रूपये दिले जातात. याशिवाय द्रोणाचार्य पुरस्कार, लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार यासारखे पुरस्कार देखील वितरीत केले जातात.

हेही वाचा -बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरला व्हायचे होते क्रिकेटर

हेही वाचा -...तर डोपिंग चाचणीतील दोषी खेळाडू देखील क्रीडा पुरस्कारासाठी पात्र - क्रीडा मंत्रालय

Last Updated :Sep 9, 2021, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details