महाराष्ट्र

maharashtra

महिला हॉकी : भारताचा जपानवर २-१ ने विजय

By

Published : Aug 17, 2019, 1:48 PM IST

ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आज शनिवारी यजमान जपानचा पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिलांनी सामन्यात २-१ अशी बाजी मारली. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.

महिला हॉकी : भारताचा जपानवर २-१ ने विजय

टोकियो - ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आज शनिवारी यजमान जपानचा पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिलांनी सामन्यात २-१ अशी बाजी मारली. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.

सामन्यात भारतीय संघाची स्टार खेळाडू गुरजीत कौर हिने दोन गोल केले. तर यजमान जपानकडून ईमी निशिखोरी हिने एकमात्र गोल केला. भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच आक्रमण सुरु केले. गुरजीतने आठव्या मिनिटाला गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर मात्र, यजमान जपानच्या खेळाडू निशिखोरी हिने १६ मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. तेव्हा गुरजीत हिने ३५ व्या मिनिटाला गोल करत संघाला २-१ ने बढत मिळवून दिली.

ही बढत तोडण्यासाठी जपानच्या खेळाडूंनी वारंवार आक्रमण केले. मात्र, भारतीय बचावरक्षकांनी गोल करु दिले नाही. आणि भारतीय संघ २-१ ने विजयी झाला. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी होणार आहे.

Intro:Body:

spo


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details