महाराष्ट्र

maharashtra

भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती

By

Published : Jan 2, 2020, 3:04 PM IST

Updated : Jan 2, 2020, 3:16 PM IST

भारतीय हॉकी संघाची डिफेंडर आणि माजी कर्णधार सुनिता लाकडाने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

indian women hockey team defender sunita lakra announced retirement
भारतीय महिला हॉकी खेळाडू सुनिता लाकडाची निवृत्ती

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाची डिफेंडर आणि माजी कर्णधार सुनिता लाकडाने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सुनिता २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियाई स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघाची सदस्य होती. तिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती.

सुनिता मागील काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होती. यामुळे तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना सुनिताने सांगितले की, 'गुडघ्यावर पुन्हा एकदा सर्जरी करावी लागणार आहे. यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे.'

आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भावूक ठरला, कारण मी आज आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे, असेही सुनिताने सांगितले. त्यामुळे २८ वर्षीय सुनिताचे टोकियो ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

सुनिता लाकडा

सुनिताने २००८ मध्ये भारतीय हॉकी संघात प्रवेश केला. त्यानंतर २०१८ मध्ये तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन चषकात दुसरा क्रमांक पटकावला होता. सुनिताने १३९ सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. दरम्यान, सुनिताने आंतरराष्ट्रीय स्तरामधून निवृत्ती घेतली असली तरी ती दुखापतीतून सावरल्यानंतर स्थानिक स्पर्धेत हॉकी खेळणार आहे.

हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना बलाढ्य अर्जेंटिनाशी

हेही वाचा -हॉकी : नेदरलँड, कॅनडा संघ टोकियो ऑलंम्पिकसाठी पात्र

Intro:Body:

sports news


Conclusion:
Last Updated :Jan 2, 2020, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details