ETV Bharat / sports

हॉकी : नेदरलँड, कॅनडा संघ टोकियो ऑलंम्पिकसाठी पात्र

author img

By

Published : Oct 28, 2019, 1:29 PM IST

रविवारी पाकिस्तान-नेदरलँड या संघात पात्रता फेरीतील दुसरा सामना खेळला गेला. यात नेदरलँडने पाकिस्तानचा ६-१ अशा फरकाने पराभव केला. तत्पूर्वी पहिल्या पात्रता सामना उभय संघात ४-४ च्या बरोबरीत सुटला होता. मात्र, दुसरा सामना एकतर्फा जिंकत नेदरलँडने टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले. दरम्यान, नेदरलँडचा संघ ऑलंम्पिक स्पर्धेत १९ व्यांदा सहभागी होत आहे.

हॉकी : नेदरलँड, कॅनडा संघ टोकियो ऑलंम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली - नेदरलँड आणि कॅनडा या दोनही देशाच्या पुरुष हॉकी संघाने आगामी टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे. जपानमध्ये होणाऱया ऑलंम्पिक स्पर्धेसाठी रंगलेल्या पात्रता फेरीत नेदरलँडने पाकिस्तानचा तर कॅनडाने आयरलँडचा पराभव करत टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेत स्थान पटकावले.

रविवारी पाकिस्तान-नेदरलँड या संघात पात्रता फेरीतील दुसरा सामना खेळला गेला. यात नेदरलँडने पाकिस्तानचा ६-१ अशा फरकाने पराभव केला. तत्पूर्वी पहिल्या पात्रता सामना उभय संघात ४-४ च्या बरोबरीत सुटला होता. मात्र, दुसरा सामना एकतर्फा जिंकत नेदरलँडने टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले. दरम्यान, नेदरलँडचा संघ ऑलंम्पिक स्पर्धेत १९ व्यांदा सहभागी होत आहे.

दुसरीकडे कॅनडाने शूटआउटमध्ये ३-१ (१-१) ने आयरलँडवर बाजी मारली. हा सामना रोमांचक ठरला. मात्र, मोक्याच्या क्षणी कॅनडाने बाजी पलटवली.

हेही वाचा - महिला हॉकी : २० व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सविताने खेळला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना

हेही वाचा - हॉकी : जोहोर कप स्पर्धेत भारताचा जपानकडून पराभव

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.