महाराष्ट्र

maharashtra

महिला विश्वकरंडक 2022 चे पात्रता फेरीचे सामने होणार झिम्बाब्वेत

By

Published : Aug 19, 2021, 3:56 PM IST

झिम्बाब्वेमध्ये महिला विश्व करंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

Zimbabwe to host 2022 Women's Cricket World Cup qualifiers
महिला विश्वकरंडक 2022 चे पात्रता फेरीचे सामने होणार झिम्बाब्वेत

दुबई - झिम्बाब्वेमध्ये महिला विश्व करंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. या पात्रता फेरीला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहेत. आयसीसीने याची घोषणा आज केली.

न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी महिला विश्वकरंडक होणार आहे. ही स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीची घोषणा आयसीसीने आज केली. दरम्यान, अद्याप 10 संघ सहभागी होणाऱ्या या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही. ते पुढील काही दिवसात करण्यात येणार आहे.

आयसीसी महिला विश्व करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. तर आणखी पाच संघ या स्पर्धेसाठी पात्रता फेरीत निश्चित होतील.

स्पर्धेच्या पाचव्या सत्रात बांगलादेश, आर्यलंड, नेदरलंड, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका, थायलंड, अमेरिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे सहभागी होतील.

हेही वाचा -T-20 वर्ल्ड कप : 'या' दिवशी रंगणार भारत-पाक संघाचा पहिला सामना; वेळापत्रक जाहीर

हेही वाचा -WI vs PAK Test : रोमांचक सामना वेस्ट इंडिजने अवघ्या एक विकेटने जिंकला, लक्ष्मणने केलं कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details