ETV Bharat / sports

T-20 वर्ल्ड कप : 'या' दिवशी रंगणार भारत-पाक संघाचा पहिला सामना; वेळापत्रक जाहीर

author img

By

Published : Aug 17, 2021, 1:35 PM IST

आयसीसीने नुकतेच टी-20 विर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑक्टोंबरला ओमान आणि पापुआ न्युगिनी या दोन देशात पहिला सामना होणार आहे. हे दोन्ही संघ ग्रुप बी मध्ये असून पहिल्या फेरीतील त्यांच्यात सामना होईल. तर 24 ऑक्टोंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिला सामना रंगणार आहे.

T-20 वर्ल्ड कप
T-20 वर्ल्ड कप

हैदराबाद - आयसीसीने नुकतेच टी-20 विर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑक्टोंबरला ओमान आणि पापुआ न्युगिनी या दोन देशात पहिला सामना होणार आहे. हे दोन्ही संघ ग्रुप बी मध्ये असून पहिल्या फेरीत त्यांच्यात सामना होईल. तर 24 ऑक्टोंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिला सामना रंगणार आहे.

वेळापत्रक जाहीर
वेळापत्रक जाहीर

17 ऑक्टोंबरला रंगणार पहिला सामना -

17 ऑक्टोंबरला पहिल्या दिवशी दोन सामने रंगणार आहे. दुसरा सामना स्कॉटलँड आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. त्याशिवाय आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नांबिबिया या देशांचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. ग्रुप ए मधील पहिला सामना 18 तारखेला होणार आहे. 22 ऑक्टोंबरपर्यंत फेरीतील सर्व सामने खेळले जाणार आहे. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील दोन टॉप संघांना सुपर-12 मध्ये जागा निश्चित होणार. ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश असेल. पहिल्या फेरीनंतर 23 ऑक्टोंबरपासून सुपर-12 मधील संघाच्या समान्याची सुरुवात होईल. यामधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या होईल. हा सामना अबुधाबी याठिकाणी होईल. त्याचदिवशी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुबई येथे दुसरा सामना रंगणार आहे.

भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये -

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले. तर आठ संघ इतर चार क्रमांसाठी पात्रता फेरीत लढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.